!-- afp header code starts here -->

Goa -महिला शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान कधी होणार?

चाळीस वर्षांचा संघर्ष : काणकोण, बाळ्ळ्ळी, मोरपिर्ला, पिर्ला, बेतोडातील महिलांची व्यथा
मडगावात दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोरील फुटपाथावर बसून भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी महिला.
मडगावात दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोरील फुटपाथावर बसून भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी महिला.
Published on
Updated on
Summary
  • आश्वासने केवळ नावापुरती...

  • प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे कायमस्वरूपी बाजारपेठेची मागणी

  • स्वतंत्र शेड, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालयाची गरज

  • सुरक्षित विक्रीची जागा

मडगाव : दक्षिण गोव्यातील काणकोण, बाळ्ळी, मोरपिर्ला, पिर्णी आणि बेठोदा या गावांतील अनेक महिलांचा पहाटे चार वाजताच दिवस सुरू होतो. घरातील कामे उरकून, स्वतःच्या शेतात आणि परसबागेत पिकविलेल्या ताज्या भाज्या टोपल्यांमध्ये मरून त्या बसने किंवा खासगी वाहनाने मडगावकडे रखाना होतात. गेली जवळपास ४० वर्षे हा प्रवास अखंड सुरू आहे; परंतु विक्रीसाठी हक्काची जागा नसल्याने रोज रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करणे या ग्रामीण भागातील महिलांसाठी वेदनादायी ठरत आहे. त्यांच्या कष्टाचा सन्मान आणि जगण्याचा हक्क कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

एवढी वर्षे शहराला ताजा भाजीपाला पुरवणाऱ्या या महिलांकडे आजही स्वतःची कायमस्वरूपी विक्रीसाठी जागा नाही. कधी सोपो शुल्काच्या नावावर लूट, तर कधी अतिक्रमण कारवाईच्या नावावर केली जाणारी सातावणूक, नित्याचीच आहे. काणकोण, बाळ्ळी, मोरपिर्ला, पिर्ला आणि बेतोडा येथील दुर्गम भागात हा रानमेवा तयार केला जातो.

केवळ पावसाळ्यात काढले जाणारे पीक राज्याची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मडगाव शहरात आणून विकला जातो. श्रावण महिन्यात या रानभाज्यांना फार मागणी असते. केवळ पावसाळ्यातील भाज्या विकून त्यावर कुटुंबाचा खर्च भागवणाऱ्या या महिला कोणत्याही मोठ्या व्यापाऱ्यांच्या साखळीचा भाग नाहीत. त्यांच्या हातातील भाजी ही थेट त्यांच्या शेतातून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचते. भेंडी, वांगी, मिरची, कारली, तोंडली, पालेभाज्या, सुरण, कंदमुळे, हंगामी भाज्या आणि अनेक पारंपरिक स्थानिक पिके त्या विक्रीसाठी

अनेकदा जागा रिकामी करण्याचे आदेश मिळतात, तर काही वेळा ग्राहक नसल्याने उरलेला माल परत गावात या महिलांपैकी अनेकजण आता साठ-सत्तर वर्षांच्या आहेत. तरीही कुटुंबाच्या आर्थिक गरजेसाठी त्या रोज मडगावला येतात. त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे, घर चालावे आणि शेती टिकून राहावी यासाठी त्यांनी आयुष्यभर हा व्यवसाय केला. काही महिलांनी तर आपल्या मुलांचे शिक्षण आणि लसाचा खर्चही या भाजी विक्रीतून भागवल्याची माहिती गावकर यांनी दिली.

आणतात. त्यामुळे मडगावकरांना ताज्या, स्थानिक आणि स्वस्त भाज्या प्राप्त होतात उदरनिर्वाहासाठी उन्हाच्या कडक झळा, मुसळधार पाऊस, धूळ, चिखल आणि वाहतुकीच्या धोक्यात दिवसभर बसून त्यांना विक्री करावी लागते. अनेकदा जागा रिकामी करण्याचे आदेश मिळतात, तर काही वेळा ग्राहक नसल्याने उरलेला माल परत गावात न्यावा लागतो. दिवसभर कष्ट करूनही हातात फारशी कमाई राहत नाही, अशी माहिती काणकोण येथील महिला विक्रेत्या भागे गावकर यांनी दिली. आणि वाहतुकीच्या धोक्यात दिवसभर बसून त्यांना विक्री करावी लागते.

न्याय देण्याची गरज : डिकॉस्ता

चार दशकांपासून शहराची भूक भागवणाऱ्या या महिला आजही एका छोट्याशा जागेसाठी प्रशासनाच्या दारात उभ्या आहेत. त्यांच्या मागणीमागे राजकारण नाही, तर कष्टाचा सन्मान आणि जगण्याचा हक्क आहे. आता तरी प्रशासनाने या महिला शेतकऱ्यांना न्याय देत मडगावमध्ये कायमस्वरूपी विक्रीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी केली आहे.

न खपलेल्या भाज्या होतात खराब

गावडोंगरी येथील वासंती गावकर यांनी सांगितले की, रानभाज्याना ग्रामीण भागात फार मागणी नसल्याने लहान मुलांना शेजाऱ्या जवळ ठेवून आम्हाला पहाटे मिळेल त्या वाहनाने मडगावात यावे लागते. न खपलेल्या भाज्या खराब होतात. त्या साठवून ठेवण्यासाठी कोणतीच व्यवस्था ही उपलब्ध नाही. भाज्या परत नेणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे त्या खपवण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत मडगावात थांबावे लागते. बस नसल्याने कित्येक वेळा आम्ही फुटपाथावर रात्र घालवली आहे.

मडगावात दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोरील फुटपाथावर बसून भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी महिला.
Goa Staff Selection Commission Group C Recruitment 2026|गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे २१५ गट 'क' पदांसाठी भरती

'फार्म टू कन्झ्युमर'

बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांऐवजी थेट शेतकऱ्यांकडून भाजी घेण्याला शहरातील ग्राहक प्राधान्य देतात. त्यामुळे 'फार्म टू कन्झ्युमर' ही साखळी मजबूत राहते आणि स्थानिक शेतीलाही आधार मिळतो. कृषी क्षेत्रातील जाणकार प्रसाद चारी यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना अशा महिला विक्रेत्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे गोव्यातील पारंपरिक शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मत व्यक्त केले.

मडगावात दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोरील फुटपाथावर बसून भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी महिला.
Goa Valpoi Students Class Boycott| वाळपईत विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार, जुन्या शिक्षकांना हटवून नव्या नियुक्त्या; शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news