Aleixo Reginaldo Lourenco | आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या वाढदिवशी कुडतरीत उत्साहाचे वातावरण; शुभेच्छांचा वर्षाव!

Aleixo Reginaldo Lourenco | वाढदिवस कार्यक्रम उत्साहात; कुडतरी मतदारसंघाच्या विकासाबाबत चर्चा
Aleixo Reginaldo Lourenco
Aleixo Reginaldo Lourenco
Published on: 
Updated on: 


सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा वाढदिवस सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी कुडतरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघातील नागरिकांनी आमदार लॉरेन्स यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कुडतरीच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षांवरही यावेळी चर्चा झाली.

Aleixo Reginaldo Lourenco
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह त्यांचे समर्थक, हितचिंतक, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. उपस्थितींना संबोधित करताना आमदार लॉरेन्स यांनी जनसेवेप्रती आपली बांधिलकी, कुडतरी मतदारसंघातील विकासकामे, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर भाष्य केल्याचे सांगण्यात आले.

सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. त्या सर्वांनी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे सलग चार वेळा निवडून येऊन कुडतरी मतदारसंघात भरीव विकास केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.

Aleixo Reginaldo Lourenco
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

कुडतरीच्या विकासासाठी सदैव तत्पर:

वाढदिवसाचा हा कार्यक्रम केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न राहता कुडतरी मतदारसंघाच्या भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन मांडणारा ठरल्याचे चित्र दिसून आले. ते म्हणाले, 'आपण कुडतरीच्या विकासाबरोबर जनतेच्या वैयक्तिक विकासासाठी शेवटच्या क्षणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि तमाम लोकांच्या पाठिंब्याने यशस्वी ठरलो. यापुढे आपण मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी सदैव झटत राहणार आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news