Goa High Court | मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा मोठा निर्णय; 14 वर्षीय पीडित मुलगी बाळासह कुटुंबाच्या स्वाधीन!

Goa High Court | खंडपीठाकडून याचिका निकालात, संशयित अटकेत
Goa High Court
Goa High Court File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बलात्काराच्या पोलिस तपासासाठी तब्बल दोन महिने कुटुंबापासून 'अपना घर'मध्ये निवास करावा लागलेल्या १४ वर्षीय पीडित मुलीला तिच्या बाळासह कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देत याचिका निकाली काढली. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

Goa High Court
Sadanand Tanavade | गोवा ते सोलापूर थेट रेल्वे सेवा सुरू करा! खासदार सदानंद शेट तानावडे यांची दिल्लीत मागणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या मार्गदर्शनानंतर आणि महाधिवक्त्यांच्या सूचनेनुसार उत्तर गोवा बाल कल्याण समितीने (सीडब्ल्यूसी) पीडितेला कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला.

मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गर्भवती राहिली होती. उपचारासाठी सरकारी इस्पितळात गेली असता स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिल्याने हे प्रकरण समोर आले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून संबंधित संशयिताला अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news