

भूषण आरोसकर
पणजी : लेन्सद्वारे प्रत्येक फ्रेममध्ये भावना तयार करणे हे एक संवादात्मक सत्र इफ्फीत झाले. यावेळी सिनेमॅटोग्राफर रवी वर्मन यांच्या जीवन प्रवासाविषयी मॉडरेटर चित्रपट निर्माते संजीव सिवन यांनी संवाद साधला. यामध्ये वर्मन यांच्या दृश्य जगाला आकार देणाऱ्या अंतःप्रेरणा, आठवणी आणि शांततेने लढाया देणाऱ्या अनेक गोष्टींचा प्रवास होता.
वर्मन यांनी सुरुवातीच्या संघर्षांपासून ते आता त्याच्या फ्रेम्स परिभाषित करणाऱ्या कलात्मकतेपर्यंतचा मार्ग शोधला. प्रत्येक प्रतिमेमागे एक कला आणि जीवन दोन्ही असते, असे वर्मन म्हणाले. वर्मन यांच्या जीवनाची सुरुवात कष्टांनी भरलेली होती. सातवीत शाळा अर्धवट सोडल्यामुळे, ते चेन्नईत त्याच्या एकमेव साथीदारासह आले. त्यांनी पहिला कॅमेरा 130 रु.ला विकत घेतला. हे कार्य त्यांनी कलात्मक महत्त्वाकांक्षेतून नाही तर स्वत:च्या स्वच्छंद जगण्यासाठी केले आणि हळूहळू यातून त्यांचे सिनेमॅटोग्राफीचे स्वप्न हळूहळू वाढत गेले आणि पुढे ते परिस्थितीनुसार साकारही झाले, अशी माहिती यावेळी दिली. अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्समध्ये सामील होण्याची त्याची आकांक्षा नंतर उदयास आली. चित्रपटसृष्टीतील पटकथेपासून ते दूर होते. जेव्हा ते चेन्नईला आले तेव्हा चित्रपट निर्मिती हे केवळ स्वप्न नव्हते, तर त्यांच्यासाठी ते जगणेही होते. या खडतर प्रवासादरम्यान तेे अनेकदा रेल्वे स्थानकांजवळ झोपायचे.