Mayem Constituency Goa Election | मयेतून प्रेमेंद्र शेट की सुलक्षणा सावंत?

Mayem Constituency Goa Election | भाजपसह विरोधी पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी
Sulakshana Sawant role
महाराष्ट्र भाजप महिला सह प्रभारीपदी सुलक्षणा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

डिचोली तालुक्यातील मये हा असा मतदारसंघ आहे की तेथे आमदार वारंवार बदलताना दिसतात. एक किंवा दोन वेळा निवडून आल्यानंतर तिसऱ्या वेळी येथे तो आमदार निवडून येत नाही. भंडारी समाजाच्या मतदारांची मोठी संख्या असतानाही या मतदारसंघात गेली अनेक वर्षे भंडारी समाजाचा उमेदवार निवडून आलेला नाही.

Sulakshana Sawant role
Goa Assembly Election | नावेलीत पुन्हा कमळ फुलणार?

मये मतदारसंघात विरोधकांची उमेदवार चाचपणी सुरू असून भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान आमदार प्रेमेंद्र शेट यांनाच संधी मिळण्याची शक्यता असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रा. सुलक्षणा सावंत यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. त्याशिवाय इच्छुकांमध्ये गोवा फॉरवर्डतर्फे संतोषकुमार सावंत व राजेश कळंगुटकर, काँग्रेसतर्फे नेहरू युवा केंद्राचे निवृत्त राष्ट्रीय संयुक्त संचालक कालिदास घाटवळ, गुणाजी गावकर, मिलिंद पिळगावकर, श्रीकृष्ण परब, अजय प्रभूगावकर यांचा समावेश आहे.

मये मतदारसंघात चोडण, मये वायंगिणी, पिळगाव, कारापूर सर्वण, शिरगाव व वन मावळिंगे अशा सहा पंचायती येतात. २००७ ते २०१२ मध्ये अनंत शेट निवडून आले होते. त्यांनी विधानसभेचे सभापतीपदही भूषवले होते. त्यानंतर २०१७ मध्ये प्रवीण झांट्ये व २०२२ मध्ये प्रेमेंद्र शेट निवडणूक आले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रेमेंद्र शेट हे भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. असे असले तरी भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी असलेल्या प्रा. सुलक्षणा सावंत यांच्याही नावाची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. २०२२ च्या निवडणुकीतही त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र दोन आमदारांच्या पत्नींना उमेदवारी दिलेली असताना मुख्यमंत्र्याच्या पत्नीलाही उमेदवारी दिल्यास घराणेशाहीची टीका प्रखरपणे होण्याची शक्यता गृहित धरुन प्रा. सावंत यांच्याऐवजी मगो पक्षाचे उमेदवार म्हणून पुढे आलेले प्रेमेंद्र शेट यांना भाजपने पक्षात घेऊन उमेदवारी दिली.

ते ७,८७४ मते घेऊन निवडून आले. आमदार शेट यांनी गेली साडेचार वर्षे आमदार व फलोत्पादन विकास महामडंळाचे अध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले आहे. ते तरुण आहेत. त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी देणार की सुलक्षणा सावंत यांना संधी देणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

दुसरीकडे, या मतदारसंघातून आमदार होण्याची स्वप्ने पाहणारे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस संतोषकुमार सावंत यांना २०२२ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची ४,७३८ मते मिळाली होती. यावेळी प्रा. राजेश कळंगुटकर हे गोवा फॉरवर्डमध्ये दाखल झालेले असल्याने तेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे कळते. २०२२ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून २०८४ मते मिळवली होती. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीमध्ये २०२२ मध्ये हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडण्यात आला होता. यावेळी युती झाली तर तसेच होण्याची शक्यता आहे.

आरजी पक्षाचे उमेदवार असलेले श्रीकृष्ण परब यांनी ३९७४ मते मिळवली होती. प्रवीण झांट्ये यांनी मगोची उमेदवारीवर ३४२४ मते मिळवली होती. शिरगावचे उद्योजक गुणाजी गावकर हेही मयेतून लढण्याची तयारी करत असून अजय प्रभूगावकर हेही इच्छुक उमेदवार आहेत. मये मतदार संघाची प्रमुख समस्या आहे ती म्हणजे या मतदारसंघातील काही भाग हा पोर्तुगीज कस्टोडीयनच्या मालकीचा आहे.

Sulakshana Sawant role
Mahayuti Legislative Council Victory | महायुतीचा दबदबा

त्यामुळे येथील घरांना संरक्षण देत त्यांना सनदा देण्याची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू ठेवली आहे. मात्र, अद्याप अनेक लोक सनदांच्या प्रतीक्षेत आहेत.

कालिदास घाटवळ इच्छुक

नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय संयुक्त संचालक म्हणून निवृत्त झालेले शिरगावचे रहिवासी कालिदास घाटवळ हेही मयेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. स्वांतत्र्यसैनिक कांता घाटवळ यांचे ते पुत्र असून त्यांनी तब्बल ३२ वर्षे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा केली आहे. त्यांचे घराणे हे काँग्रेसचे असल्याने त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी मये मतदारसंघात भरीव योगदान दिलेले असल्याने व विशेषतः युवा वर्गात ते लोकप्रिय असल्याने त्यांनी निवडणूक लढवली तर निवडणुकीत रंगत वाढेल हे मात्र नक्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news