Margao Work From Home Fraud | वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 2.20 लाखांची फसवणूक

Margao Work From Home Fraud | वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने २ लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना मडगाव येथे उघडकीस आली आहे.
Margao Work From Home Fraud
Margao Work From Home FraudPudhari
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने २ लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना मडगाव येथे उघडकीस आली आहे. अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात आरोपींनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Margao Work From Home Fraud
Goa State Bar Council Election 2026 | गोवा बार कौन्सिल निवडणुकीत मोठा ट्विस्ट! निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती कायदेशीर लढाईनंतर रद्द

मडगाव येथील गोत्रू क्रांती राजकुमार (मूळ रहिवासी आंध्र प्रदेश) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. दि. ९ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला.

वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने विविध व्यवहारांद्वारे एकूण २ लाख २० हजार रुपये हस्तांतरित केले.

Margao Work From Home Fraud
Panaji Municipal Corporation | पणजी महापालिकेचा करदात्यांना अल्टिमेटम! 31 मे पूर्वी घरपट्टी आणि व्यवसाय कर भरणे बंधनकारक

मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा दिला नाही तसेच संपर्क तोडला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस स्वदेश देसाई (एमटीपीएस) यांच्याकडे सोपविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाइन आमिषांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news