Margao Wholesale Fish Market | मडगाव मासळी मार्केटमध्ये बाणावलीच्या मच्छीमारांसाठी स्वतंत्र जागा द्या

Margao Wholesale Fish Market | आमदार वेंझी व्हिएगस यांची जागेबाबत कार्यवाहीची मागणी
Goa Fish Market Rates
Goa Fish Market Rates Pudhari File Photo
Published on
Updated on

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

'आप'चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी नूतनीकरण केलेल्या मडगावच्या घाऊक मासळी बाजारात बाणावली मतदारसंघातील पारंपरिक मच्छीमारांसाठी स्वतंत्र जागा असावी, अशी मागणी केली आहे. स्थानिक मच्छीमार समुदायाला पुरेसे प्रतिनिधित्व आणि सुविधा मिळायला हव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

Goa Fish Market Rates
Margao Wholesale Fish Market | मडगावातील मासळी मार्केटचे उ‌द्घाटन रखडले

व्हिएगास म्हणाले की, बाजार सुरू झाल्यानंतर जागा वाटपाबाबत बाणावली आणि इतर किनारी गावांमधील अनेक पारंपरिक मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे. समुद्रातून थेट ताजी मासळी आणणाऱ्या मच्छिमारांना प्राधान्य दिले जावे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित केली जावी, यावर त्यांनी भर दिला.

पारंपरिक मच्छीमार ताजी मासळी घेऊन बाजारात येतात आणि स्थानिक मत्स्यव्यवसायाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. बाणावली मतदारसंघातील मच्छीमारांना घाऊक मासळी बाजारात जागा मिळेल, याची हमी दिली गेली पाहिजे.

Goa Fish Market Rates
Margao Wholesale Fish Market | मडगावातील मासळी मार्केटचे उ‌द्घाटन रखडले

बाणावलीच्या आमदारांनी सरकारला नूतनीकरण केलेल्या बाजाराचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहनही केले, जेणेकरून मच्छीमारांना सुधारित पायाभूत सुविधांचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.

मच्छीमारांच्या हितासाठी प्रयत्न आवश्यक

व्हिएगस यांनी पुन्हा एकदा नमूद केले की, मच्छीमार समुदाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. घाऊक मासळी बाजाराचे कामकाज सुरळीत चालण्याची खात्री करतानाच पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news