Michael Lobo CRZ Case | "सीआरझेड बनावट दस्तऐवजप्रकरणी मायकल लोबोंना न्यायालयाचा मोठा दिलासा!"

Michael Lobo CRZ Case | सीआरझेड बनावट दस्तऐवजप्रकरणी मायकल लोबोंना न्यायालयाचा दिलासा
Goa News
आमदार मायकल लोबो
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कथित बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात आमदार तथा नाझरी रिसॉर्टचे मालक मायकल लोबो आणि फ्रँकी व्हिएगश यांची म्हापसा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात पुरेसा आणि ठोस पुरावा सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याने न्यायालयाने दोघांचीही निर्दोष सुटका केली.

Goa News
Mumbai Goa Highway Accident |मुंबई-गोवा महामार्गावर अमोनिया गॅसचा टँकर पलटी; गॅसगळती टळल्याने मोठा अनर्थ टळला

हे प्रकरण २०१० मध्ये क्राईम ब्रँचकडून नोंदविण्यात आले होते. नाझरी रिसॉर्टसाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याच्या प्रक्रियेत गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापनाशी संबंधित काही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सर्व काही आता पारदर्शक : मायकल लोबो

"माझा न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास होता व न्याय मिळाला. २००९ साली विरोधात असताना राजकीय हेतूने प्रेरित नाझरी रिसॉर्ट सीआरझेड बनावट कागदपत्रांच्या वापर करून बांधण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. यामागे कोण होता याची मला माहिती आहे. या रिसॉर्टचा भाग सीआरझेडमध्ये नव्हता तर सीआरझेड रेषेपासून ५० मीटर अंतरावर हे रिसॉर्ट होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे मला स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, सर्व काही आता पारदर्शक आहे." अशी प्रतिक्रिया आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news