Manikrao Thackeray Goa | म्हादईचे पाणी गोव्याला मिळावे यासाठी काँग्रेस सुरुवातीपासून आग्रही - माणिकराव ठाकरे

Manikrao Thackeray Goa | माणिकराव ठाकरे : काँग्रेसला गोमंतकीय जनताच बहुमताने निवडून देणार
Manikrao Thackeray
Manikrao Thackeray
Published on: 
Updated on: 

पणजी : प्रभाकर धुरी
म्हादई नदीतील गोव्याच्या वाट्याचे पाणी गोव्याला मिळावे, यासाठी काँग्रेस पहिल्यापासूनच आग्रही आहे, अशी भूमिका काँग्रेसचे सहप्रभारी माणिकराव ठाकरे यांनी 'पुढारी'शी बोलताना मांडली. ते म्हणाले, गोवा राखून यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

Manikrao Thackeray
Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

लोकांना आता बदल हवा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला बहुमत देईल. राज्यात ३ नोव्हेंबरपासून गाव राखण यात्रा सुरू करण्यात येणार आहे. या अभियानातून प्रत्येक मतदान केंद्र आणि घरापर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या गोवा दौर्यामुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानाबाबत विचारले असता, 'त्यांचे विधान आम्ही गांभीर्याने घ्यायचे का? बोलायचे आहे, ते बोलतील. आम्ही त्यांच्या विधानाला नव्हे, तर गाव राखण यात्रेला गांभीर्याने घेत आहोत,' असे ठाकरे म्हणाले.

अमित पाटकर काँग्रेसचेच

ॲड. अमित पालेकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे 'गोवा काँग्रेस' या नव्या पक्षाच्या स्थापनामागे असल्याचा आरोप केला होता. त्यावर ठाकरे म्हणाले की, हे आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पाटकर काँग्रेसमध्येच असून, ते गोवा राखून यात्रेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी काँग्रेस सोडलेली नसून ते पक्षाचेच आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षांतर करणाऱ्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे बंद

पक्षांतर करणाऱ्यांमुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली आहे. ती बदलून जनतेला स्थिर सरकार देण्याचा विश्वास द्यायचा आहे. त्यामुळे पक्षांत गेलेल्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गोव्यात काँग्रेस बहुमताचे सरकार स्थापन करेल, असेही ठाकरे म्हणाले.
आरजीपी आणि काँग्रेस यांच्यातील बोलणी अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसने उमेदवारांची चाचपणीही सुरू केली आहे.

गोवा फॉरवर्डशी आघाडीसाठी चर्चा केली जाणार आहे. पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांवविरोधात असल्याने आप आघाडीत सहभागी होणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
सरकारची जमीन रूपरंतरणासंदर्भातील विधेयके दोन वेळा न्यायालयाने फेटाळूनही सरकार तिसऱ्यांदा न्यायालयात गेले आहे.

Manikrao Thackeray
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३९ ए रद्द केले जाईल. बेरोजगारी, भ्रष्टाचार, अमलीपदार्थाचा प्रश्न, ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेसह अन्य मुद्दे आगामी निवडणूक प्रचारात मांडले जातील, असेही ते म्हणाले. सरकारला करचोरी आणि कॅसिनोंमधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

गेल्या काही वर्षांत मुख्यमंत्र्यांची मालमत्ता दहांपट, तर इतर मंत्र्यांची मालमत्ता चार ते पाचपट वाढली आहे. एवढा पैसा येतो कुठून, असा सवाल करत त्यांनी हा भ्रष्टाचार नाही तर काय, असा प्रश्न उपस्थित केला.
भाजप सरकारने राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज केले असून, प्रत्येक गोवेकराच्या डोक्यावर दोन लाख दहा हजार रुपयांचे कर्ज आहे. राज्यातील रुग्णालये, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, कायदा व सुव्यवस्था आणि नशामukti या क्षेत्रांत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

logo
Pudhari News
pudhari.news