AI cancer diagnosis Goa | एआयद्वारे कॅन्सरचे निदान करणारे गोवा पहिले राज्य

आरोग्यमंत्री विश्वजित राणे ; १ लाखांहून अधिक लोकांच्या फुप्फुसाच्या तपासण्या
AI cancer diagnosis Goa | एआयद्वारे कॅन्सरचे निदान करणारे गोवा पहिले राज्य
Published on
Updated on

पणजी : गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने अ‍ॅस्ट्राझेनेका इंडिया व क्युअर एआय यांच्या सहकार्याने राज्यातील १,०८,४७४ लोकांच्या फुप्फुसाची तपासणी एआयच्या माध्यमातून केली असता, त्यातील २० जणांना फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले, तर १०,५०० जणांना फुप्फुसातील गाठी सापडल्या.

ही मोहीम पुढील वर्षभर सुरूच राहील व किमान २ लाख लोकांची तपासणी केली जाईल. एआयद्वारे कर्करोगाचे निदान करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

गोव्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा

राव प्रवीण राव म्हणाले की, गोवा राज्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. गोवा आरोग्य सेवा संचालनालय आणि क्युअर एआय यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो आणि १ लाखांहून अधिक एआय-सक्षम फुप्फुस तपासणी स्कॅन पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. अ‍ॅस्ट्राझेनेकाचे विज्ञान, गोव्याचे सार्वजनिक आरोग्य नेतृत्व आणि क्युअर एआयची क्षमता यांच्या सहकार्याने लवकर निदान व लवकर उपचार करून लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राव म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news