Goa Mandrem Parshuram temple|मांद्रे मतदारसंघात लवकरच परशुरामाचे मंदिर

आमदार जीत आरोलकर : चोपडेत भगवान परशुरामांच्या पुतळ्याचे अनावरण
Goa Divine Mandrem
चोपडे पुतळा अनावरण केल्यानंतर उपस्थित आमदार जीत आरोलकर, जिल्हा पंचायत सदस्य तारा हडपडकर, सरपंच शिल्पा नाईक व इतर. pudhari photo
Published on
Updated on

पेडणे : चोपडे पुलाजवळ भगवान परशुराम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मद्रि मतदारसंघात भव्य भगवान परशुराम मंदिर उभारण्याची घोषणा आमदार जीत आरोलकर यांनी केली.

Goa Divine Mandrem
हौशी रंगभूमीची निष्ठेने सेवा करणारी कलाकार : सुषमा बुगडे

भगवान परशुराम पुतळा विकास समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार आरोलकर बोलत होते. यावेळी मोरजी जिल्हा पंचायत सदस्य तारा हडपडकर, पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, आगरवाडा सरपंच शिल्पा नाईक, उपसरपंच संगीता नाईक, पंच भगीरथ गावकर तसेच विविध गावांतील माजी सरपंच, पंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुतळा साकार करणारे उमाकांत पोके व श्री. नाईक यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार आरोलकर यावेळी म्हणाले, काही जर्णाना मतदारसंघाच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा का उभारला, असा प्रश्न पडू शकतो; मात्र भगवान परशुरामांनीच ही भूमी निर्माण केली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. हरमल येथील परशुराम टेकडीवर पुतळा उभारण्याचा प्रयत्न अद्याप सुरू असल्याचे सांगून, विविध अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे मांद्रे मतदारसंघात हा पुतळा उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१९ च्या पोटनिवडणुकीदरम्यान भगवान परशुराम स्वप्नात आल्याचा अनुभव सांगत त्यांनी हा संकल्प पूर्ण केल्याचेही नमूद केले.

Goa Divine Mandrem
Goa off the record | रस्ता काय तुमच्या वडिलांचा...!

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कोरखंडकर यांनी मनोगत व्यक्त करत संत सोयरोबानाथ आंबिये आणि जीवबा दादा केरकर यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची मागणी केली. तसेच हरमल येथील परशुराम टेकडीचे महत्त्व अधोरेखित केले. मोरजी जिल्हा पंचायत सदस्य तारा हडपडकर यांनी आमदार आरोलकर यांच्या प्रयत्नांतून चोपडे परिसरात भगवान परशुराम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उभारणी झाल्याचे सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. स्थानिक पंच भगीरथ गावकर यांनीही मतदारसंघात विविध पुतळ्यांच्या उभारणीमुळे सांस्कृतिक व ऐतिहासिक बारशाला चालना मिळत असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news