Goa Mandovi bridge accident : गोव्‍यातील मांडवी पुलावरील भीषण अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

दुचाकीची टॅक्‍सीला धडक , मृत लॉ कॉलेजचे विद्यार्थी
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 
Updated on: 

Goa Mandovi bridge accident

पणजी, पुढारी वृत्तसेवा : मांडवी पुलावर आज (दि. २६) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात नोंदणीकृत दुचाकीने टॅक्सीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. कुशाग्र पटाळे ( २१, रा. मुंबई), यश मालिक सिंग (२०, हरियाणा) अशी अपघातात ठार झालेल्‍या विद्यार्थींची नावे आहेत. दोघेही सांकवाळ येथील कायदा महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

पहाटे दुचाकीची टॅक्‍सीला धडक, तरुणांचा जागीच मृत्‍यू

मिळालेल्या माहितीनुसार, कुशाग्र आणि यश हे सांकवाळ येथील कायदा महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. पहाटे ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरुन मांडवी पुलावरुन जात होते. यावेळी त्‍यांच्‍या दुचाकीची टॅक्‍सीला धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र
Goa Assembly Election | भाजप-मगो युतीत सात मतदारसंघांचा तिढा

टॅक्‍सीतील प्रवासी किरकोळ जखमी

दुचाकीने टॅक्‍सीला दिलेल्‍या धडकीत दुचाकीवरील दोघां तरुणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर चालकासह टॅक्‍सीमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास पोरवोरिम पोलीस करीत आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र
Goa Assembly Election | गोवा विधानसभेत 2027 मध्ये भाजप-मगो, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-आरजी आणि 'आप' यांच्यात तिरंगी लढतीची शक्यता

मृत तरुण मुंबई आणि हरियाणातील

कुशाग्र पटाळे हा मुंबईतील रहिवासी होता. तर यश मालिक सिंग हा मूळचा हरियाणतील होता. दोघेही गोव्‍यातील कायदा महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्‍यांच्‍या अपघाती मृत्‍यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
Goa Water Scarcity | गोव्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी जुन्या विहिरी, तलाव आणि जलस्रोतांचा शोध सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news