Mandar Surlkar Murder Case | मंदार सुर्लकर हत्या प्रकरण; आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात!

Mandar Surlkar Murder case | गेल्या गुरुवारी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचा १८ डिसेंबर २०२५ रोजीचा निर्णय रद्द केला होता.
Child CareMandar Surlkar Murder Case
Mandar Surlkar Murder Case (Pudhari File Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मंदार सुर्लकर अपहरण व हत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रोहन पै धुंगत, जोवितो रायन पिंटो आणि शंकर तिवारी या तिघांच्या अकाली सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाविरुद्ध गोवा सरकारने आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे.

Child CareMandar Surlkar Murder Case
Goa Marathi Rajbhasha | गोव्यात मराठीला दुसऱ्या राजभाषेच्या दर्जासाठी लढा आक्रमक; 31 ऑगस्टला विधानसभेवर महामोर्चा!

गेल्या गुरुवारी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचा १८ डिसेंबर २०२५ रोजीचा निर्णय रद्द केला होता.
या निर्णयाद्वारे सरकारने राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने केलेली तिघांच्या अकाली सुटकेची शिफारस नाकारली होती. राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, सरकारने आधीच अपील दाखल केले असून, पुढील सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध होणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news