

पणजी : पुढारी वृत्तसेवा : म्हादईचे पाणी कर्नाटक वळवत आहे. गोव्याचे अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल तर म्हादई नदी वाचवणे आवश्यक आहे, असे मत आमदार मायकल लोबो यांनी आज (दि.३१) विधानसभेत व्यक्त केले. (Goa Assembly Session)
विधानसभेत आज म्हादईच्या प्रश्नासंदर्भात आमदार लोबो बोलत होते. ते म्हणाले की, म्हादई नदी गोव्याची जीवनदायिनी आहे. जलस्रोत मंत्र्यांनी या प्रश्नी गंभीर भूमिका घ्यावी. म्हादईवरील बंधारे बांधण्यासाठीही सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी. (Goa Assembly Session)
राज्यातील पाण्याचे नियोजन योग्य रितीने व्हावे. चार महिन्यांपूर्वीही आपण म्हादई प्रश्नी सरकारने आग्रही भूमिका घेण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी पडतेच, या कालावधीत नदीचा प्रवाहही मोठा असतो. मात्र, राज्याला नदीच्या प्रवाहाचे पाणी मिळावे. कमतरता भासू नये. या संदर्भात नियोजन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.