जळगाव : गोवा स्थित फ्लाय ९१ विमान कंपनीने गोवा पर्यटन आणि इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (आईएचसीएल) यांच्या विद्यमान सहयोगाने जळगाव महाराष्ट्र येथे 'रोड शो' कार्यक्रम आयोजित केला होता. जळगाव हे सोने, कापूस आणि केळी या तीन गोष्टींसाठी जाणले जाते, तर इथून अधिकाधिक पर्यटक गोव्यात यावेत या ध्येयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
फ्लाय ९१ ने नुकतीच जळगाव ते गोवा दैनंदिन विमानसेवा सुरु केली आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून जळगाव ते गोवा पर्यटकांची सकारात्मक हालचाल समजून घेता येईल अशी अशा वर्तवण्यात आली आहे.