Goa University Canteen-गोवा विद्यापीठ कॅन्टिनमधील जेवणात आढळल्या अळ्या

संतप्त भाजप युवा मोर्चाचा कुलसचिवांना घेराव; कॅन्टिन चालकाचे कंत्राट रद्द
Goa University Canteen
पणजी : कुलसचिवांना घेराव घालून जाब विचारताना भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते.
Published on
Updated on

पणजी : गोवा विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी संघटनांनी वारंवार केल्या आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनाला छाप्यावेळी निकृष्ट पदार्थ सापडले असतानाही कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले जात नसल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे कुलसचिव सुंदर धुरी यांना घेराव घालत जाब विचारला.

Goa University Canteen
Goa | विजेचा धक्का लागून लाईन हेल्परचा मृत्यू, अस्नोडातील घटना; फांद्या छाटतेवेळी दुर्घटना

केळकर यांनी सांगितले की, गेली तीन वर्षे कॅन्टिनच्या जेवणात अळ्या व इतर कीटक सापडत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने व इतर पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे कॅन्टिनचे कंत्राटदार बदलण्याची मागणी केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.

यावेळी पणजीच्या नगरसेविका करीना शिरोडकर व भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच गोवा विद्यापीठाच्या कॅन्टिनमधील जेवणात अळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराची दिवसभरात जोरदार चर्चा होती.

Goa University Canteen
Monsoon Rainfall Deficit | राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, २६.७ टक्क्यांपर्यंत वाढली पावसाची तूट

कॅन्टिन चालकाला 'कारणे दाखवा'

गोवा विद्यापीठाच्या कॅन्टिन चालकाविरुद्ध आलेल्या तक्रारी पाहता त्याला कारणे दाखवा नोटीस देत त्याचे कॅन्टिन कंत्राट रद्द करण्यात आलेले आहे. विद्यापीठाचे दुसऱ्या भागामध्ये कॅन्टिन चालवणाऱ्या स्वयंसहाय्य गटांना सध्या मुख्य इमारतीमध्ये कॅन्टिन चालवण्यास देणार आहे आणि त्यानंतर निविदा काढली जाईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. सुंदर धुरी यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news