Goa | विजेचा धक्का लागून लाईन हेल्परचा मृत्यू, अस्नोडातील घटना; फांद्या छाटतेवेळी दुर्घटना

Line Helper Death - विजेचा धक्का लागून लाईन हेल्परचा मृत्यू, अस्नोडातील घटना; फांद्या छाटतेवेळी दुर्घटना
death
death pudhari File Photo
Published on
Updated on

डिचोली : डिचोली तालुक्यातील अस्नोडा येथे शुक्रवारी सकाळी झाडांच्या फांद्यांची छाटणी करत असताना विजेचा धक्का लागून वीज खात्यातील लाईन हेल्पर मंथन आरोसकर (रा. म्हावळींगे-डिचोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत काम करणारे अन्य दोन कर्मचारी झाल्या प्रकारामुळे भयभीत झाले. त्यांच्यावर डिचोली आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे वीज खात्यात हळहळ व्यक्त होत असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

death
भाजप मतदारसंघात ढवळाढवळ नको

अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरात क्रेनच्या साहाय्याने झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने मंथन यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

death
Goa Politics Churchill Alemao: वालका यांना उमेदवारी दिल्यास लढणार नाही... चर्चिल आलेमाव यांचा तडजोडीचा प्रस्ताव

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे पाठविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास कोलवाळ पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news