Madgaon Social Media Fraud | सोशल मीडियाच्या माध्यमातून चार लाख रुपयांची फसवणूक

Madgaon Social Media Fraud | सोशल मीडियावर बनावट ओळख वापरून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
Social Media News
Social Media News : सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी सरकारची समिती गठीतFile Photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर बनावट ओळख वापरून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारीनुसार, संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखवत तिची फसवणूक केली.

Social Media News
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

बनावट खाते तयार करून महिलेला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवत तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील २८ वर्षीय तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेशी मैत्री केली, तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आर्थिक तसेच भावनिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या दिवंगत आईची सोन्याची साखळी आणि अंगठी धार्मिक विधीच्या नावाखाली घेतल्याचेही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःची खोटी ओळख वापरत सोशल मीडियावरून महिलेशी संपर्क साधला होता.

Social Media News
Jal Jeevan Mission | मनखेडमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण; हंडा मोर्चाचा इशारा

सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. कालांतराने आरोपीने विविध कारणे पुढे करत महिलेकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले.

कधी वैयक्तिक अडचण, तर कधी लग्न आणि धार्मिक कार्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत त्याने सुमारे चार लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने कोलवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news