Teacher Controversy | चॅनेल करा 'लाईक', तर मार्क होतील 'स्पाइक'! पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेचा अजब सल्ला पालकांमध्ये चर्चेचा विषय

Teacher Controversy | चॅनेल करा लाईक, तर मार्क होतील स्पाइक, असेच जणू त्या शिक्षिकेने सुचवल्याने तो पालकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
Primary Teachers
Primary TeachersAI
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगावातील एका कॉन्व्हेंट शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील बहुतांश धडे आणि कविता वर्गात शिकवण्याऐवजी 'स्वाध्ययन' करण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अडचण आल्यास संबंधित भाषा शिक्षिकेचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब आणि लाईक करण्यास सांगण्यात आले. चॅनेल करा लाईक, तर मार्क होतील स्पाइक, असेच जणू त्या शिक्षिकेने सुचवल्याने तो पालकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Primary Teachers
Sal River Pollution | सासष्टीची जीवनदायिनी धोक्यात! मडगाव-फातोर्डाच्या सांडपाण्याने साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची पुढील आठवड्यापासून परीक्षा सुरू होणार आहे. संबंधित विषयाच्या अभ्यासक्रमात सहा धडे आणि कवितांचा समावेश असताना, त्यापैकी केवळ एक धडा सविस्तर शिकवून त्याची प्रश्नोतरे विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत.

उर्वरित धडे आणि कविता विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यासत्वात, असे वर्गात सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर काही पालकांनी शिक्षकेशी संपर्क साधला. त्यावेळी शिक्षिकेने स्वतःचा यूट्यूब चॅनेल असून आवश्यक माहिती तेथून घेण्याचा सल्ला दिल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

तसेच वाहिनीवरील माहिती पाहताना 'लाईक' आणि 'सबस्क्राईब' करण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या चार-पाच महिन्यांत विद्यार्थ्यांना या चॅनेलवर काही धड्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण उपलब्ध असले, तरी सर्व धड्यांची सविस्तर माहिती, प्रश्नोतरे आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक अभ्याससामग्री उपलब्ध नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी पालकांवर आली आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांसह पालकही चक्रावून गेले आहेत.

Primary Teachers
Ganpati Special Trains 2026: गणपतीसाठी मडगाव व कुर्ला येथून विशेष गाड्या

...आणि त्या बंदीचे काय?:

सरकार १६ वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी आणण्याचा विचार करत असताना इथे पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका स्वतः यूट्यूब चॅनेल बघा म्हणून सांगत असेल तर ती गंभीर गोष्ट आहे, असे काही पालकांनी सांगितले.

शिक्षण खाते यावर काही कारवाई करणार का? नेमके किती आणि काय शिकवण्यात आले, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. पाचवीतील विद्यार्थ्यांना धडे, कविता आणि प्रश्नोतरे स्वतः समजून घेण्यास सांगणे कितपत योग्य, याबद्दलही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news