Madgaon Fire Case | मडगाव येथे 2 ठिकाणी आगीच्या घटना

Madgaon Fire Case | गॅस पाईपलाईन लिकेजच्या घटनेसह, घोगळ येथे डोंगराला आग
Goa Fire News
Goa Fire NewsPudhari
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगाव अग्निशमन दलाने दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्या. घोगळ येथे मनोविकास शाळेजवळ डोंगराला आग लागली होती. तर दवर्ली येथे गॅस पाईपलाईनची गळती होऊन आग लागली. दोन्ही घटनांत मोठी दुर्घटना टळली आहे.

Goa Fire News
Morjim Beach Turtle Conservation | 29 वर्षांत सागरी कासवांनी घातली 54,290 अंडी

डोंगराला आग लागल्याच्या घटनेत सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मडगाव अग्निशमन केंद्राला दुपारी घोगळ येथील मनोविकास शाळेजवळ डोंगराला आग लागल्याची माहिती मिळाली.

अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आणि आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या घटनेत सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून वाचवलेल्या मालमत्तेचा अंदाज उपलब्ध नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी मोठी दुर्घटना टळल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सौजा यांनी दिली.

Goa Fire News
Dhargal AYUSH Hospital | ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांवरही होणार उपचार

पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती

सकाळी दवर्ली येथील रुमडामळी हाऊसिंग बोर्ड परिसरात मारुती मंदिरामागे रस्त्यालगत असलेल्या गॅस पाईपलाईनला गळती होऊन आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

गॅस पाईपलाईनमधील गळतीमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. आग आटोक्यात आणल्यानंतर गॅस पाईपलाईन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news