Morjim Beach Turtle Conservation | 29 वर्षांत सागरी कासवांनी घातली 54,290 अंडी

Morjim Beach Turtle Conservation |1997 पासून 1,496 कासवे किनारी; अडथळे होत असल्याने काही सागरी कासवे फिरताहेत माघारी
Morjim Beach Turtle Conservation
Morjim Beach Turtle Conservation
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

मोरजी समुद्रकिनारी भागात कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत या हंगामात आतापर्यंत २५ सागरी कासवांनी २७०० पेक्षा जास्त अंडी घातली. काही सागरी कासवांना अडथळे निर्माण होत असल्यामुळे अंडी न घालता सागरी कासव माघारी फिरत असल्याचेही पाहावयास मिळत आहेत.

Morjim Beach Turtle Conservation
Dhargal AYUSH Hospital | ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांवरही होणार उपचार

ज्या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते; तो किनाराही धोकादायक बनला आहे. सागरी कासव मोहीम १९९७सालापासून मोरजी किनारी भागात ते आजपर्यंत राबवली जाते. आतापर्यंतच्या या हंगामात १४९६ सागरी कासवांनी अंडी घातली होती. त्यातील ५४,२९० पिल्लांना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सुरक्षितपणे समुद्रात सोडलेले आहे. या सागरी कासव मोहिमेला जवळजवळ २९ वर्षे पूर्ण होत आहे.

या २९ वर्षात सर्वात कमी २०१० साली केवळ तीन सागरी कासवांनी १४५ अंडी घातली होती. आणि सर्वांत विक्रमी २०२३ ते २०२४ साली तब्बल १५,१४६ अंडी घातली होती. १९९७-९८ साली पाच सागरी कासवांनी ४५६ पिल्ले, १९९८-९९ साली ८ सागरी कासवांनी २६२ पिल्ले, १९९९-२००० साली १४ सागरी कासवांनी अंडी घातली होती. त्यातील ७५९ पिल्ले सोडण्यात आली. २०००-२००१ साली ३१ सागरी कासवांनी अंडी घातली होती. त्यातील २४३० पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. २००१-२००२ साली १९ सागरी कासवांनी अंडी घातली.

त्यातील १५४७ पिल्ले २००२० २००३ साली ६ सागरी कासवांनी ५३२ पिल्ले २००३-४ साली ९ सागरी कासवांतून ६६२ पिल्ले, २००४-५ साली ४ सागरी कासवांनी अंडी घातली. त्यातून ३६० पिल्ले सोडली. २००५-६ साली ६ सागरी कासवांनी अंडी घातली होती. त्यातील ५५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. २००६-७ साली पाच सागरी कासवांकडून २५० पिल्ले आली होती.

२००७-८ साली ६ सागरी कासवाने अंडी घातली होती त्यातील ४५४ पिल्ले समुद्रात सोडली. २००८-९ साली ३ सागरी कासवाची २२८ पिल्ले, २००९-१० साली ५ सागरी कासव आणि अंडी घातली होती. त्यातील ५१२ पिल्ले सोडली. २०१०-११ साली तीन सागरी कासवाची १४५ पिल्ले, २०११-१२ साली १४ सागरी कासवाची १०४५ पिल्ले, २०१२-१३ साली ७ सागरी कासवाची ५०१ पिले, २०१३-१४ साली ४ सागरी कासवाच्या १६२ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले २०१४-१५ साली ८ सागरी कासव आली. त्यातील ३३१ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

२०१५-१६ साली १० सागरी कासवांनी अंडी घातली. त्यातील ३७८ पिलांना समुद्रात सोडण्यात आले. २०१७-१८ साली एकूण १० सागरी कासवांनी अंडी घातली. त्यातील ३५८ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. २०१७-१८ साली १४ सागरी कासवांनी अंडी घातली होती.

९९० पिल्ले सोडण्यात आली. २०१८-१९ साली २२ सागरी कासवांनी अंडी घातली होती. त्यातील १३२२ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. २०१९ साली १५ सागरी कासवांनी अंडी घातली होती. त्यातील १०,४३७ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. २०२० साली ६९ सागरी कासव आले होते. त्यातील ३८७६ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

२०२३-२४ साली सर्वाधिक १५, १४६ पिल्लांची नोंद

२०२३-२४ साली सर्वाधिक विक्रमी सागरी कासव तब्बल २१६ सागरी कासव आली होती. त्यातील १५,१४६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. २०२४-२५ साली १७६ सागरी कासव अंडी घातली होती. त्यातील १२८५७पिल्ले सोडण्यात आली होती. या हंगामात २५ सागरी कासवाने २७०० अंडी घातलेली आहे. अजूनपर्यंत एकाही पिल्लास समुद्रात सोडण्यात आले नाही.

Morjim Beach Turtle Conservation
Mapusa Flyover Construction | म्हापसा पेडे जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम सुरू; लवकरच वाहतूक कोंडी सुटणार

सागरी कासवांना आणले जातात

अडथळे सागरी कासव अंडी घालण्यासाठी दिवसा-रात्री केव्हाही समुद्रकिनाऱ्यावर येतात. आणि कोणतेही अडथळे नसले तर ती सहज अंडी घालून परत पाण्यात जातात. एखादा मोठा अडथळा निर्माण झाला तर ही कासवे अंडी न घालताही माघारी फिरतात.

अशीच घटना नुकतीच रात्री १०.३० वाजता घडली. गावडेवाडा मोरजी समुद्रकिनाऱ्यावर एक सागरी कासव आले होते. ते इकडे तिकडे फिरले; परंतु अंडी न घालता ते निघून गेले. या ठिकाणी काही प्रमाणात पर्यटक आणि संगीताचा मोठा आवाज सुरू असल्यामुळे ते कासव माघारी फिरल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news