Goa Night Club Fire Case | लुथरा बंधूंच्या अडचणीत वाढ! म्हापसा पोलिसांची नवी कारवाई; हणजूण गुन्ह्यात जामीन असूनही जेलमध्येच मुक्काम

Goa Night Club Fire Case | हडफडे अग्निकांडप्रकरणातील नाईट क्लबचे मालक गौरव व सौरभलुधरा बंधूंना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला.
Goa Nightclub Fire Case
Goa Night Club Fire Case File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे अग्निकांडप्रकरणातील नाईट क्लबचे मालक गौरव व सौरभलुधरा बंधूंना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला. मात्र, त्यांना म्हापसा पोलिसांनी बोगस प्रमाणपत्रप्रकरणी अटक केली आहे. त्यांचा या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी प्रलंबित आहे.

Goa Nightclub Fire Case
Goa Cyber Crime News | राज्यात सायबर गुन्ह्यांत ६५ टक्के वाढ

त्यामुळे हणजूण गुन्ह्यामध्ये जामीन मिळाला असला तरी लुथरा बंधूंना अजूनही कोठडीत राहावे लागणार आहे. या अग्निकांडप्रकरणातील लुधरा बंधू यांचा नाईट क्लब व्यवसायामधील भागिदार अजय गुप्ता याला यापूर्वीच सशर्त जामीन मिळाला होता. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी न्यायालयात तपासकाम पूर्ण करून बंधू आरोपपत्र सादर केले आहे.

Goa Nightclub Fire Case
Nashik Rickshaw | नाशिकमध्ये रिक्षाचालकांचे हाल! 3 दिवसांपासून गॅसपंप कोरडे; 8 एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा

त्यामुळे लुथरा बंधूंना कठोर अटी घालून जामीन देण्यास हरकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन देताना नोंदवले. संशयितांना प्रत्येकी ५० हजारांचा जाचमुचलका व तत्सम रकमेचा एर हमीदार सादर करणे व इतर नियमित अटी लागू असतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news