

हरमल : दांडोसवाडा येथील मच्छिंद्रनाथ कायसुकर यांच्या निवासस्थान समोर बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
दांडोसवाडा सरकारी प्राथमिक शाळेपासून 200 मीटर अंतरावर असलेल्या कायसुकर यांच्या निवासस्थान समोर रात्री 11 च्या सुमारास दर्शन झाल्याने नागरिक अचंबित झाले. सीसीटीव्हीत कैद झाल्याने ग्रामस्थानी आश्चर्य व भीती व्यक्त केली.
दरम्यान, हरमल पार्सेकरवाडा, भटवाडी भागात गवे रेडे येत असल्याने काजू झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्याचे बागायतदार फर्नांडिस यांनी सांगितले.