Goa News | सभापतींसह मुख्यमंत्री दिल्लीत

केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट; वन खात्याच्या मुद्द्यांवर चर्चा
cm pramod sawant speaker tawadkar meet minister bhupender yadav delhi
नवी दिल्ली : केंद्रीय वन, हवामान खात्याचे मंत्री भूपेंद्रजी यादव यांना पुष्पगुच्छ देताना सभापती डॉ. रमेश तवडकर. बाजूस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्यासह नवी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. गोव्यातील पर्यावरण व वनविषयक अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान गोव्यातील विकास प्रकल्पांमध्ये येणार्‍या पर्यावरणीय अडचणी, वनजमिनींच्या वापराबाबतचे धोरण, ईको-सेन्सिटिव्ह झोन संदर्भातील स्पष्टता, तसेच किनारपट्टीवरील विकास योजना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, केंद्रीय मंत्री यादव यांनी या सर्व बाबी गांभीर्याने घेत त्वरित काही समस्यांवर निर्णय घेतले. त्यांच्या सकारात्मक द़ृष्टिकोनामुळे गोव्यातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. गोव्यासारख्या लहान राज्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी वेळ देऊन आम्हाला ऐकून घेतले आणि त्वरित कृती केली, हे आमच्यासाठी आश्वासक आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील जैवविविधतेचे संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण, आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या उपाययोजनांची माहिती देखील दिली.

बैठकीदरम्यान गोव्याच्या भौगोलिक रचनेनुसार विशेष धोरणे राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. गोवा हे पर्यटनावर अवलंबून असलेले राज्य असल्याने, विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखणे गरजेचे आहे, यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली.

विविध रस्त्यांसाठी मंजुरीबाबत सकारात्मक आश्वासन

मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि सभापती तवडकर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री यादव यांची त्यांच्या भेटीत प्रामुख्याने सकल तिरवाळ-पैंगिण येथील प्रस्तावित रस्ता, नडके-खोतीगाव या भागातील पूल व रस्ता बांधकाम या विषयांवर चर्चा झाली. या प्रकल्पांसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी आवश्यक असल्याने, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत चौकशी करण्यात आली.

या विषयांची तातडीने पूर्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर कोणते उपाय करता येतील, याविषयी सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पांसाठी मंजुरी देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news