Harmal Leopard Attack | हरमलमध्ये बिबट्याच्या दहशतीत वाढ; दोन महिन्यांत कुत्र्याला लक्ष करण्याची चौथी घटना समोर

Harmal Leopard Attack | दोन महिन्यांत चार घटना; उदय वायंगणकर यांच्या अंगणातील कुत्र्याला केले लक्ष्य
Leopard Attack
Leopard Attack
Published on: 
Updated on: 

हरमल : पुढारी वृत्तसेवा
खालचावाडा भागातील उदय वायंगणकर यांच्या घरच्या अंगणात बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने लक्ष्य केल्याने स्थानिक नागरिकांत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बिबट्याच्या वावराचा हा प्रकार वायंगणकर यांच्या घराबाहेरील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.

Leopard Attack
Goa Harmal Navratri Festival | हरमल नवरात्रौत्सवात ११ ते १९ पर्यंत भरगच्च कार्यक्रम

दरम्यान, या घटना पाहता वनविभाग, सरकारते बिबट्याचा वेळेच बंदोबस्त करावा, अशी मागणी हरमल येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. खालचावाडा भागातील उदय वायंगणकर यांच्या घराच्या अंगणात बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने लक्ष्य केले. मंगळवारी (दि. २७) पहाटे ४.१५ सुमारास बिबट्याची अंगणात एंट्री झाली व चाहूल न लावता अंगणात बसलेल्या कुत्र्याला आपले भक्षय करण्याचा प्रयत्न केला.

याची चाहूल अन्य एका कुत्र्याला जाग आली व तो भुंकू लागला. हरमल खालचावाडा हा भाग काहीसा डोंगराळ भागाच्या जवळ असल्याने बिबट्यांना वस्तीत येणे शक्य होते. रात्रीच्या वेळी जनावरांना ते आपला भक्ष्य बनवतात.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना लोकांसमोर येतात. गेल्या दोन महिन्यांत बिबट्याने कुत्र्यांना लक्ष्य केल्याची ही चौथी घटना आहे. एका घटनेत पहिल्या मजलल्यावर धाव घेत, कुत्र्याच्या मानेला पकडून तीन मीटर उंचावरून उडी मारून धूम ठोकली. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.

Leopard Attack
Goa Harmal Farmers Worried | पावसाचा लहरीपणा; शेतकरी हवालदिल शेती पूर्णतः परिपक्व न झाल्याने हरमल परिसरातील शेतकरी चिंतेत

डोंगर, जंगल भागातील जमिनी विकल्याचे परिणाम

दरम्यान, जंगल परिसरातील भाग, डोंगरातील जमिनींची विक्री होत असल्याने हे वन्य प्राणी लोकव्स्तीत येऊ लागले आहेत. दरम्यान, या गोष्टीला सरकारचे धोरण जबाबदार आहे, असे वायंगणकर यांनी सांगितले.त्या प्राण्यांना जंगलात खाद्य न मिळाल्यास, लोकवस्तीत निश्चित भक्ष्य मिळेल, वस्तीत येण्यापासून वन्य प्राण्यांना भिवपाची गरज ना, असे सरकार म्हणत आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी सरकारला लगावला.

वनखात्याच्या हालचाली थंडावल्या : वायंगणकर

दरम्यान, वन खात्याने, दोन महिन्यांपूर्वीच्या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याच्या हालचाली कमी केल्याचे समजते. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडे दोन पिंजरे आहेत. एक-दोन दिवसांच्या कारवाईने जेरबंद करणे शक्य नसल्याचे वायंगणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.