

हरमल : नवरात्रौत्सव मंडळाच्या १९ व्या उत्सवानिमित्त रविवार, दि. ११ ते १९ ऑक्टोबरपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंत गडेकर, सचिव संजय मयेकर यांनी दिली.
दररोज सकाळी ९ कुंकुमार्चन, सायं. ६.३० वा. हभप संजयबुवा कर्नाळकर, (नागपूर) यांचे कीर्तन, त्यांना उदेश पेडणेकर (हार्मोनियम) व अंकुश नाईक (तबला) साथ करतील. माजी सरपंच प्रशांत नाईक, प्रकाश दाभोळकर व दीपक तांडेल यांनी कीर्तन पुरस्कृत केले आहे.
पहिल्या दिनी सकाळी ९ वा. श्री दुर्गा मूर्तीचे भूमी भरत नाईक यांच्या निवासस्थानावर आगमन सकाळी ११ वा. घटस्थापना पूजन, नंतर आरती, ११ वा. ओम साई महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायं. ३ वा. श्री राष्ट्रोळी ब्राह्मण घुमट आरती वस्तवाडातर्फे घुमट आरती व रात्री 9.30 वा आमंत्रित दांडिया, गणेशोत्सव सभागृहात होणार आहे.
सोमवार, दि. १२ रोजी सकाळी ९ वा. श्रीमत दुर्गा सप्तशती आणि होमहवन, दुपारी २.३० वा. नैसर्गिक फुले व पानापासून हार बनवणे व ३.३० वा. श्री नारायणदेव महिला भजनी मंडळाचे भजन व रात्री ९.३० वा. दशावतारी नेरूर कुडाळ, यांचे नाटक 'भक्त प्रल्हाद' होईल.
मंगळवार, दि. १३ रोजी सकाळी ९.३० वा. संयुक्त प्रासादिक भजनी मंडळ सोनुर्ली (वास्को रहिवासी) यांचे भजन, दुपारी २.३० वा. चित्रकला व रंग भरणे स्पर्धा, दुपारी ३.३० वा. हनुमान भजन मंडळ, मांद्रे यांचे भजन (सुचक उदेश पेडणेकर) व रात्री 9 वा स्थानिक ज्येष्ठ गवंडी कारागिरांचा सत्कार सोहळा व तदनंतर दांडिया होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर उपस्थित राहतील.
बुधवार, दि. १४ रोजी सकाळी १० वा. श्री आजोबा महिला फुगडीतर्फे फुगडी, दुपारी २.३० वा. नऊवारी साडी ड्रेपिंग स्पर्धा, ३.३० वा. शांतादुर्गा भजन मंडळ वारखंड व रात्री 9 वा. म्हापण वेंगुर्ला, यांचे 'आईने गर्भवास भोगीला, नाळीविना पुत्र जन्मला दशावतारी नाटक. पंचायत सभागृहात होईल.
गुरुवार, दि. १५ रोजी सकाळी १० वा. श्री वाटेराम महिला फुगडी दुपारी २.३० वा. रांगोळी स्पर्धा व ३.३० वा. हरी भजन मंडळ यांचे भजन व रात्री ९ वा. कोकणी विनोदी नाटक 'टेन्शन फ्री' गणेशोत्सव सभागृहात होईल. सदर नाटक संदीप केपकर, यश विर्नोडकर व रजत हरमलकर यांनी पुरस्कृत केले आहे.
शुक्रवार, दि. १६ रोजी सकाळी १० वा. श्री दुर्गादेवी महिला फुगडी, हरमल (सूचक समिता नाईक), दुपारी २.३० वा. मेहेंदी स्पर्धा, ३.३० वा. नवसो भजन मंडळ, (सूचक राजन वस्त), रात्री ९.३० वा. 'यक्ष चंडिका युद्ध' महिला दशावतार नाटक नाटक पंचायत सभागृहात होईल.
शनिवार, दि. १७ रोजी सकाळी १० वा. सरस्वती फुगडी मंडळाची फुगडी, दुपारी २.३० वा. लहान मुलांसाठी खेळ, ३.३० वा. हेरंब भजन मंडळाचे भजन, रात्री ९ वा. अखिल गोवा नृत्य स्पर्धा (एकल) होईल.
रविवार, दि. १८ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी २.३० वा. संत सोहिरोबानाथ आंबिये सांस्कृतिक महिला भजन मंडळाचे भजन, (सूचक राधा परब), नंतर ढोलकी भजन पालये, रात्री ८ वा. हभप संजयबुवा कर्नाळकर यांचा सांगता कार्यक्रम, सत्कार, देणगी कूपन निकाल, पुरस्कर्त्यांचे सन्मान, ९.३० वा. 'दैव जाणिले कुणी' दशावतार नाटक पंचायत सभागृहात होईल. सदर नाटक महेश पै व सुहास प्रभू यांनी पुरस्कृत केले आहे.
सोमवार, दि. १९ रोजी सकाळी ९ वा. कुमारिका पूजन, ११ वा. पावणी, नंतर आरती, तीर्थप्रसाद, दुपारी ३ वा. सामूहिक गाऱ्हाणे व ३.३० वा. सिंधुगर्जना ढोल पथकाच्या साथीत श्रीमूर्तीची समुद्रस्थळी विसर्जन मिरवणूक होईल. यंदा सतीश शेटगावकर, अर्जुन खोर्जे व दर्शन नाईक यांनी ढोल पथक पुरस्कृत केले आहे.