Leopard
Leopardpudhari

Bicholim News| मुळगावात बिबट्यासोबत आता रानडुकरांचा त्रास

Bicholim News| गावकरवाडा, मुळगाव येथे मागील वर्षी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

गावकरवाडा, मुळगाव येथे मागील वर्षी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard
Goa News | मासळी विक्री जोरात; भाजी, फळ विक्रेत्यांची पाठ

सद्यस्थितीत रात्रीच्या वेळी महिला व लहान मुले बाहेर पडताना घाबरत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता डुकरांनाही त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. हल्लीच एका घराच्या मागील बाजूस बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला होता.

आता मात्र बिबट्याबरोबरच रानडुकरांचाही वावर वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी पहाटे येथील सुनील राऊत यांच्या अंगणात रानडुकर नारळ सोलताना दिसला. शनिवारी पहाटेही दोन-तीन नारळ सोललेले आढळले होते.

रविवारी सकाळी साडे सहा वाजता तर घरातील ज्येष्ठ महिलेला दारातच रानडुकर दिसल्याने तिची भीतीने गाळण उडाली. या डुकराने अर्धवट सोलून ठेवलेला नारळ दारातच ठेवून धूम ठोकली.

गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, डॉगरमाथ्यावर पूर्वी दाट जंगल होते; मात्र सध्या खाण व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. त्यामुळे वन्यप्राणी अन्न व निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.

Leopard
International Ayush Conference Dubai 2026 | दुबईतील आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत गोव्याची वेलनेस पर्यटनदृष्टी झळकली

परिसरात साळींदर, रानमांजर तसेच काही वेळा मगरींचाही सर्रास वावर आढळतो; परंतु आता बिबटे व रानडुकरांसारखे धोकादायक प्राणी वारंवार दिसू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने व संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा रानटी प्राण्यांच्या वावरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news