Student Harassment Case | कुशावती हादरली! 'वासनांध' प्राचार्याकडून 10 विद्यार्थ्यांचे शारीरिक शोषण; 'पुढारी'च्या वृत्ताने खळबळ

Student Harassment Case | पीडित विद्यार्थ्यांना मुजोर प्राचार्याची हस्तकाद्वारे धमकी
Harassment
HarassmentPudhari
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुशावती जिल्ह्यात एका उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्यच विद्यार्थ्यांचे शारीरिक शोषण करत असल्याचा गंभीर प्रकार दै. 'पुढारी'तून उघडकीस येताच त्या प्राचार्याचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सदर प्राचायनि इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थ्यांना आवाज उठवल्यास बारावीच्या परीक्षेला बसू देणार नाही, अशी धमकी आपल्या हस्तकाद्वारे दिल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Harassment
Goa Drug Case | ड्रग्ज प्रकरणी प्रलंबित खटल्याची सुनावणी 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश

सदर उच्च माध्यमिकमध्ये शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी प्राचार्याच्या वासनेचे शिकार झाले आहेत. दै. 'पुढारी'तून हे प्रकरण उघड होताच कुशावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सदर प्राचार्य स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत आहे. आवाज उठविल्यास बारावीच्या परीक्षेला बसून देण्याची धमकी त्याने दिली आहे.

दरम्यान, पीडित विद्यार्थ्यांनी या प्रकरणी पोलिस महासंचालक आणि दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, प्राचायनि दबाव टाकून ती मागे घेण्यास भाग पाडली होती. मात्र, या प्रकरणाला दै. 'पुढारी'ने वाचा फोडल्याने संबंधित प्राचार्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

...तर मांडीवर झोपेन

गेल्या वर्षी याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पोटदुखीमुळे त्रस्त असलेली ही विद्यार्थिनी वर्गात बाकावर डोके ठेवून आराम करत असताना प्राचायनि तिला पाहून आपल्या केबिनमध्ये बोलावले.

विद्यार्थिनीने आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगून थोडा आराम करत असल्याचे स्पष्ट केले असता, प्राचायनि पुन्हा अशा अवस्थेत दिसल्यास तुझ्या मांडीवर येऊन झोपेन, असे वक्तव्य केल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. त्यामुळे ही विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचून गेली आहे. त्यानंतर ती शाळेत येण्यास टाळाटाळ करत आहे.

Harassment
Sanquelim Land Conversion | साखळीतील ८० हजार चौ. मी. जमिनीचे रुपांतरण रद्द! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय

आयआयटीच्या प्राध्यापकाला दणका

लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांखाली दोषी आढळलेल्या पवई आयआयटीमधील एका प्राध्यापकाची सक्तीची निवृत्ती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. अंतर्गत तक्रार निवारण समितीने चौकशी केल्यानंतर दुसऱ्यांदा स्वतंत्र विभागीय चौकशी करण्याची गरज नाही,

असा निर्वाळा न्यायमूर्ती आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने दिला. हा निर्णय देत न्यायालयाने प्राध्यापकाची याचिका फेटाळून देत दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news