Konkan | कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला मोठा वेग! पेडणे अन् जुने गोव्यात खोदणार नवे बोगदे

Konkan Railway Doubling Project | कोकण रेल्वे दुपदरीकरणाला गती ; रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर
Railway Doubling Project
Railway Doubling Project
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी पेडणे आणि जुने गोवे येथे नव्याने बोगदे खोदण्यात येणार आहेत. या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.

Railway Doubling Project
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, त्यामुळे इंधनावरील वार्षिक १५० कोटी रुपयांची बचत होत आहे. आता मंगळूर ते गोवा आणि गोवा ते वैभववाडी या टप्प्यांचे दुपदरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

सर्वेक्षणानंतर प्रकल्प अहवाल तयार करून मंत्रालयाची मंजुरी घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पेडणे आणि जुने गोवे येथे बोगदे बांधावे लागणार असून, त्यासाठी निधी यापूर्वीच मंजूर झाला आहे, असे झा यांनी सांगितले. कोलाड ते सुरतकल मार्गावर सध्या ट्रक वाहून नेणारी रो-रो सेवा सुरू आहे.

Railway Doubling Project
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

ऑक्टोबरपासून या सेवेत मासिक १२ ऐवजी ४६ फेऱ्या करण्यात येणार असून, त्यातून ५७ टनी ट्रकची वाहतूक केली जाणार आहे. कोकण रेल्वेने महसूलवाढीवर भर दिला असून, त्यासाठी २३ हजार ५०० कोटी रुपयांची कामे मिळवण्यात आली आहेत, अशी माहिती झा यांनी दिली.

बोगदे खोदणे, लोहमार्गांचे विद्युतीकरण आणि पूल बांधणे यांसारख्या कामांत कोकण रेल्वेने विशेष निपुणता मिळवली आहे. त्याच्या आधारे देशातील विविध भागांतील विद्युतीकरणाची कामेही कोकण रेल्वेला मिळाली आहेत. येत्या सहा महिन्यांत आणखी १५ हजार कोटी रुपयांची कामे मिळण्याची शक्यता असल्याचे झा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news