Kingfish shortage in Goa|चमचमत्या 'किंगफिश'ची मच्छीमार, खवय्यांना प्रतीक्षा

गोव्यातील मासळी बाजारात दर्शन दुर्लभ; समुद्रातच मिळेना, तर ताटात येणार कुठून?
बेती: मालिम जेटीवर नांगरलेल्या बोटी. (छाया: प्रभाकर धुरी)
बेती: मालिम जेटीवर नांगरलेल्या बोटी. (छाया: प्रभाकर धुरी)
Published on
Updated on

पणजी : यंदाचा मासेमारी हंगाम अनेकविध कारणांमुळे अजूनही सुरळीत सुरू झालेला नाही. ज्या काही बोटी समुद्रात गेल्या त्यांना मोठ्या प्रमाणावर केवळ बांगडे आणि सोलार प्रॉन्स मिळत ना आहेत. मोठ्या प्रमाणात मागणी असणारी सुरमई अर्थात 'किंगफिश'मात्र जाळ्यात मिळत नाही. त्यामुळे सगळ्याच पातळीवरून चिंता व्यक्त होत आहे. गोव्याच्या मासळी बाजारात मान्सूनच्या काळात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा 'ईसवण' (सुरमई) यंदा दुर्मीळ झाला असून, जेवढे काही उपलब्ध आहेत त्यांची किमत प्रचंड असल्याने सामान्य ग्राहकाला ते परवडत नाहीत. हवामानातील बदल, कामगारांची टंचाई आणि एलईडी मासेमारी यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे.

मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा आणि गोवेकरांचा अत्यंत लाडका नेत असलेला 'ईसवण' म्हणजेच सुरमई (किंगफिशर) यंदा मासळी बाजारातून अचानक गायब झाला आहे. सुरमई माशांच्या या भीषण तुटवड्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, यावर मच्छीमार व्यावसायिक आणि संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. 'ऑल गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशन (एजीएफबीओए) चे अध्यक्ष जोस फिलिप डिसोझा यांच्या मते, यावर्षी उशिरा आलेला मान्सून, वाऱ्याच्या बदलत्या दिशा आणि समुद्रातील खवळलेली परिस्थिती यांसारख्या हवामान बदलांमुळे सुरमईची उपलब्धता कमालीची घटली आहे. बदलत्या हवामानामुळे मासे मिळणे कठीण झाले असून परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी समुद्रातील वातावरण शांत होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मांडवी फिशरमेन मार्केटिंग को ऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष हर्षद धोंड यांनी मात्र या समस्येचे मूळ कामगार टंचाईत असल्याचे सांगितले. सध्या प्रतिकूल हवामानाचा मुद्दा नाही. पण, कामगाराअभावी मासेमारीच बंद असल्याने बाजारात मासळी पोहोचत नाही. समुद्रात गेलेल्या बोटी दोन चार दिवसांत परततील, त्यानंतर कुठली मासळी मिळाली हे स्पष्ट होईल, असे धोंड यांनी सांगितले. जोस फिलिप डिसोझा यांनी मात्र समुद्रात अद्यापही मासेमारीला अनुकूल हवामान आहे. प्रतिकूल हवामान आणि खवळलेल्या लाटांचा माशांच्या नसल्याचे म्हटले. उपलब्धतेवर थेट परिणाम झाल्याचे स्पष्ट होते.

या संपूर्ण विवादात आणखी एक गंभीर आणि पर्यावरणीय दृष्टीने चिंताजनक मुद्दा मच्छीमार फ्रान्सिस्को फर्नाडिस (पेले) यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या तुटवड्यासाठी थेट बेकायदेशीर 'एलईडी मासेमारी'ला जबाबदार धरले आहे. मोठ्खा ट्रॉलर्सद्वारे रात्रीच्या वेळी दिव्यांचा तीव्र प्रकाश वापरून केली जाणारी एलईडी मासेमारी समुद्रातील माशांची अंडी आणि लहान मासे नष्ट करत आहे. यामुळे सुरमईसारख्या मौल्यवान माशांची पैदास धोक्यात आली असून सागरी जैविक साखळी कोलमडली आहे. मत्स्य व्यवसाय खाते व ट्रॉलर लॉबी यांच्यात साटेलोटे असल्याने या बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई होत नाही, असा आरोपही पेले यांनी केला, म्हापसा फिश वेंडर्स असोसिएशनच्या अध्यक्ष शशिकला गोवेकर यांनीही

बेती: मालिम जेटीवर नांगरलेल्या बोटी. (छाया: प्रभाकर धुरी)
Goa - गोव्याच्या 'गोमांचली' म्हशीची राष्ट्रीय नोंदणी

बाजारात मासळीची आवक कमी झाल्याचे सांगत विक्रेत्यांची अडचण मांडली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवङधानंतर परप्रांतीय कामगार परतल्यानंतर व समुद्रातील हवामान स्थिर झाल्यानंतरच परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हवामान बदल आणि बेकायदेशीर मासेमारी यांसारख्या गंभीर आव्हानांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर सुरमईचे अस्तित्व धोक्यात येण्याचा धोका आहे.

ट्रॉलर किनाऱ्यावरच

हर्षद धोंड म्हणाले की, पणजीत साधारणपणे अडीचशे बोटी आहेत. त्यातील बारा पंधराच बोटी समुद्रात उतरल्या आहेत. झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंड या राज्यांतील परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी मान्सून लांबल्याने शेतीकामात अडकले आहेत. ते कामगार अद्याप गोव्यात परत न आल्यामुळे बहुतांश ट्रॉलर किनाऱ्यावरच उभे आहेत.

बेती: मालिम जेटीवर नांगरलेल्या बोटी. (छाया: प्रभाकर धुरी)
Pramod Sawant praises Subhash Phal Dessai | मंत्री सुभाष फळदेसाईंकडून 'समाजकल्याण'ला न्याय

आरोग्यदायी असल्याने खवय्यांची पसंती

इसवण (सुरमई किंवा किंगफिश) माशांत प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् आणि व्हिटॅमिन बी १२ हे प्रमुख घटक असतात. हा मासा खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, स्नायू बळकट होतात आणि स्मरणशक्ती सुधारते. प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी उत्तम असतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् हृदयाचे व मेंदूचे आरोग्य राखणारे घटक असून, या माशात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ असते. याशिवाय सेलेनियम, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम हेही घटक असतात. हा मासा खाल्ल्याने हृदयाचे रक्ताभिसरण सुधास्ते व वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. मेंदूचे कार्य सुधारून एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. सेलेनियम व व्हिटॅमिन डीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, असे मानले जाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news