Jennifer Pig Farm Pollution | ...तर गणेशमूर्ती उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठेवू! सांडपाणी व प्रदूषणावरून कष्टी ग्रामस्थ आक्रमक

Jennifer Pig Farm Pollution | डुक्करपालन, सांडपाणीप्रकरणी मूर्ती विसर्जित न करण्याचा कष्टीवासियांचा इशारा
Jennifer Pig Farm Pollution
Jennifer Pig Farm Pollution
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
जेनिफर डुक्करपालन प्रकल्पातून नाल्यात सोडल्या जाणाऱ्या दूषित सांडपाण्याचा विषय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी झाली तरी नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यावर अद्याप कोणतीच कारवाई न झाल्यामुळे संतप्त कष्टीवासियांनी यंदा गणेश मूर्ती त्या नदीत विसर्जित न करता सांगेच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Jennifer Pig Farm Pollution
Ganpati Special Trains 2026: गणपतीसाठी मडगाव व कुर्ला येथून विशेष गाड्या

यासंदर्भात झालेल्या विशेष बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा ठराव मंजूर केला. नाल्याचे पाणी डुकरांची विष्ठा व विषारी सांडपाण्यामुळे दूषित झाले असल्याने त्यात गणेशमूर्ती विसर्जन करणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून, जेनिफर डुक्करपालन प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणीही केली आहे.


जेनिफर डुक्करपालन प्रकल्पाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कष्टी येथे ग्रामस्थांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील नाल्याच्या प्रदूषणाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. संबंधित प्रकल्पातून सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले असून, या पाण्याचा गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापर करणे धोकादायक असल्याचे ग्रामस्थ अमर नाईक यांनी सांगितले.

Jennifer Pig Farm Pollution
Konkan Railway: रोहा–मडगाव रेल्वे मार्ग होणार अधिक सक्षम; १४५ टक्के क्षमतेचा ताण

ग्रामस्थांनी एकमताने पारंपरिक विसर्जनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. नाल्यात डुकरांची विष्ठा तसेच दूषित व विषारी सांडपाणी मिसळत असताना त्याच पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. जोपर्यंत नाल्याचे प्रदूषण थांबविले जात नाही आणि परिस्थितीत सुधारणा होत नाही, तोपर्यंत पारंपरिक विसर्जन करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जेनिफर डुक्करपालन प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित प्रकल्पाकडून नियमांचे उल्लंघन करून सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत यापूर्वी संबंधित सरकारी यंत्रणांकडे तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news