

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कारापूर - सर्वण येथील नियोजित गृहनिर्माण बांधकाम प्रकल्पाच्याविरोधात शुक्रवारी स्थानिकांनी पणजीतील पर्यावरण, - नगर व शहर नियोजन (टीसीपी) कार्यालयांत धडक दिली. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला.
जोपर्यंत या प्रकल्पाला दिलेले परवाने मागे घेतले जात नाहीत; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. गेले ६९ दिवस कारापूर-सर्वण स्थानिकांनी गावातील प्रकल्पाविरोधात आंदोलन व धरणे धरले आहे. या प्रकल्पामुळे या भागातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल तसेच तेथील निसर्ग पर्यावरणाचा विनाश झाला आहे. तेथील स्थानिक लोक या नियोजित प्रकल्पाच्या जागेतील वनसंपत्तीवर उदरनिर्वाह करत आले होते.
सरकारने गृहनिर्माण बांधकाम प्रकल्पाला परवानगी देताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे या गावात लोकसंख्या वाढून स्थानिकांवर त्यांच्या मूलभूत सुविधांवर मोठा परिणाम होणार असल्याने ते आंदोलन सुरू आहे. सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही कोणताच तोडगा निघत नसल्याने स्थानिकांनी या प्रकल्पाला परवाने दिलेल्या संबंधित कार्यालयात धडक देत जाब विचारला.
बैठकीत चर्चेअंती निर्णय कारापूर सर्वण ग्रामस्थांनी सुरुवातीला पंचायत कार्यालयात धडक दिली. मात्र तेथील संचालक रजेवर असल्याने पर्यावरण खात्याकडे मोर्चा वळविला. या खात्याचे संचालक सचिन देसाई यांना या प्रकल्पाला पर्यावरण परवाना नसताना कारवाई का केली वे जात नाही, असा प्रश्न केला.
तसेच बांधकाम प्रकल्पासाठी व्यापलेल्या जागेची तपासणी करण्याची ग मागणी केली. यावर देसाई यांनी येत्या सोमवारी (१५ जून) पर्यावरण आघात क मूल्यांकन समितीची बैठक घेऊन स त्यावर चर्चा घेऊन निर्णय कळविला व जाईल, असे स्पष्ट केले.
कडक पोलिस बंदोबस्त
यावेळी पंचायत तसेच टीसीपी कार्यालयाच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वण-कारापूर ग्रामस्थांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कुझ सिल्वा, अभिजित प्रभूदेसाई, गोविंद शिरोडकर, स्वप्नेश शेर्लेकर तसेच चिंबल व सावर्डे येथील ग्रामस्थही सहभागी झाले होते.