

काणकोण : पुढारी वृत्तसेवा
काणकोण बाजारात आज टॉमेटोचे भाव वाढले असून तो प्रतिकिलो ५० रुपयांवर पोहोचला आहे. ग्रीनपीसचे दरही प्रतिकिलो १६० रुपये आहे. अन्य भाज्यांचे दर मात्र उतरले आहेत. लिंबू उतरून २ रुपये प्रति नगप्रमाणे विकला जात होता.
ग्रामीण भागातील गावठी भाज्या दाखल होण्यास आरंभ झाला आहे. आठवड्याभरापूर्वी उतरलेली वालपापडी २० रुपयांनी महागली ती १६० रुपये किलो झाली आहे.
हिरवी मिरची ६० रु. किलो झाली होती. चिटकी १२० रुपये किलो भाव कायम होता. कांदा २५ रुपये प्रति किलो, तर बटाटे ५० रुपये दीड किलो या दराने विक्री केले जात होते.
सुके बांगडे १०० रु. ५-६ नग
काणकोण बाजारात मोठ्या प्रमाणात कारवार भागातील सुकी मासळी दाखल झाली होती. सुकलेले बांगडे मोठे १०० रुपयांनी ५ ते ६, तर लहान बांगडे १०० रूपयांनी ८ ते १० होते.
नाताळ सण; अंडी महागण्यास प्रारंभ
सुकलेली कोळमी १०० रुपये पड, घालमो १०० रूपये पड प्रमाणे विकली जात होती. नाताळ सण जवळ आल्याने अंडी महाग होण्यास आरंभ झाला आहे. भाजीची केळी ५० रुपयांना चार होती. आंबाडे ५० रुपयांना १० नग प्रमाणे विकले जात होते. तिरफळे २० रुपये चुडी होती.