Jennifer Monserrate | जेनिफर मोन्सेरात यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

Jennifer Monserrate | जेनिफर मोन्सेरात यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; हिंदू पद्धतीने अंत्येष्टी, नेते व कार्यकर्त्यांची अलोट गर्दी
Jennifer Monserrate
Jennifer Monserrate
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कर्करोगाने रविवारी निवर्तलेल्या ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्यावर आज, सोमवारी अलोट गर्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध पक्षांचे नेते, मंत्री, आजी-माजी मंत्री व कार्यकर्ते यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Jennifer Monserrate
Mandar Surlakar Goa Case: 21 वर्षांपूर्वी 16 वर्षांच्या मुलाची हत्या, दोषी मारेकऱ्यांनी पूर्वसुटकेसाठी केलाय अर्ज; संपूर्ण प्रकरण काय?

सांतिनेज-पणजी येथील हिंदू स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पती मंत्री बाबूल मोन्सेरात व पुत्र महापौर रोहित मोन्सेरात यांनी जेनिफर मोन्सेरात यांच्या पार्थिवला साश्रूनयनांनी मुखाग्नी दिला.

जेनिफर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज सकाळपासून त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मंत्री, आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news