

महाराष्ट्रात सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत मोठी वाढ दिसून आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय उसळी झाली आहे. स्थानिक बाजारातही सोन्याचे भाव वाढले असून, 10 ग्रॅम सोन्याचा दर सध्याच्या काळात उल्लेखनीय पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. या उसळीमुळे सोन्याची बाजारपेठ सध्या गरम आहे आणि भविष्यातील बाजाराचा अंदाज पाहण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
आधीच महागाईच्या चटक्यांनी होरपळणाऱ्या जळगावकरांना आता सोन्या-चांदीनेही जोरदार शॉक दिला आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी (दि. २१) सोन्याने ऐतिहासिक झेप घेत थेट १ लाख ५५ हजारांचा टप्पा गाठला आहे; तर चांदीनेही ३ लाख २३ हजारांवर मजल मारल्याने
गेल्या तीन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही प्रचंड वाढ ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली आहे. जागतिक घडामोडी आणि लग्नसराईच्या तोंडावर वाढलेली मागणी, यामुळे सराफ बाजारात तेजीचे वादळ आले आहे. १९ जानेवारीला १ लाख ४४ हजारांवर असलेले २४ कॅरेट सोने आज (२१ जानेवारी) थेट १ लाख ५५ हजारांवर पोहोचले आहे. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत तोळ्यामागे तब्बल ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीनेही एकाच दिवसात १० हजार रुपयांची उडी मारत ३ लाखांचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे.