Goa Death Case | ड्रग्जचा ओव्हरडोज की हृदयविकार? वागातोरमधील तरुण पर्यटकाच्या मृत्यूचे गूढ वाढले

Goa Death Case | वागातोर येथील क्लबमधील पार्टीवेळी संशयास्पद मृत्यू
death
death pudhari File Photo
Published on
Updated on

हणजूण : पुढारी वृत्तसेवा

वागातोर येथे एका क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीदरम्यान एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वागातोर येथील एका क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इंदूर येथून आलेले नऊ पर्यटक युवक या पार्टीला गेले होते. पार्टी सुरू असताना यातील ईशान सिंग बडगुजर या २१ वर्षीय युवकाची तब्येत बिघडली.

death
Goa traffic news | पणजीत कॅसिनोंसमोरील वाहतूक कोंडीत वाढ

तो अचानक बेशुद्ध होऊन कोसळला. त्याच्या मित्रांनी इतरांच्या साहाय्याने त्याला येथील स्थानिक डॉक्टरांकडे नेले. परंतु त्याची स्थिती पाहून त्याला रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथून त्याला येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यांनीही त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला.

शेवटी त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे सर्व युवक विद्यार्थी असून बीबीए शिक्षण पूर्ण करून आलेले आहेत. सर्व हाय प्रोफाईल युवक आहेत. ते २ एप्रिल रोजी गोव्यात आले होते व ते सर्वजण येथे उतरले होते.

death
Goa Fire Case | गोव्याच्या हरमल बीचवर आगीचे तांडव! 6 रेस्टॉरंट्स जळून खाक; शॉर्टसर्किटमुळे लाखो रुपयांची हानी

हणजूण पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ईशान याचा मृत्यू अमलीपदार्थांच्या अतिसेवनाने झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले आहे. तसेच शवचिकित्सा अहवाल राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक सूरज गावस यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news