Goa traffic news | पणजीत कॅसिनोंसमोरील वाहतूक कोंडीत वाढ

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; प्रशासन, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बांदोडकर मार्गावरील प्रवास नकोसा
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

पणजी : शहरातील वाहनांची वाढती संख्या, नो पार्किंगचे गायब झालेले फलक, वाहतूक पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे वाहतूक कोंडी होत असली, तरी सगळ्यात जास्त नकोशी वाटणारी वाहतूक कोंडी होते ती ठिकठिकाणी उभ्या राहिलेल्या डी. बी. बांदोडकर मार्गावरील कॅसिनोसमो र मांडवी नदीत अनेक मोठमोठे कॅसिनो उभे आहेत. मात्र, तिकडे जाण्यासाठी बांदोडकर मार्गालगत असलेल्या कार्यालयात देशी विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या अनेक चारचाकी गाड्या रस्त्यातच उभ्या केल्या जातात. कॅप्टन ऑफ पोर्ट आणि मत्स्यव्यवसाय खात्यांच्या कार्यालयांसमोर ही वाहने उभी असतात.

अनेक वाहने विरुद्ध दिशेला पलीकडच्या रस्त्यावर सुद्धा उभी केली जातात. त्यातून उतरणारे पर्यटक बेशिस्तीने रस्ता ओलांडतात. त्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे आधीच कॅसिनो समोर उभ्या केलेल्या वाहनांमुळे अरुंद झालेल्या आणि कोंडीत रस्ता हरवलेल्या जागेतून वाहने आणि माणसे यांना चुकवत वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होते. महानगरपालिकेच्या अखत्यारीत आणि स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल त्यांना विचारले असता मनपावाल्यांनी कानावर हात घेतले. वाहतूक कोंडी होऊ न देण्याची जबाबदारी मनपाची नाही, तर कॅसिनो कंपन्यांची आहे, असे सांगण्यात आले.

पार्किंगला बंदी घालण्याची गरज

या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यावेळी वाहतूक पोलिसांचा आजूबाजूला मागमूसही नसतो. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे चालकांमध्ये बाचाबाची होते. अगदी प्रकरण हातघाईवर येते. कॅसिनोसमोर बेशिस्तीने लावली जाणारी वाहने या सगल्याला कारणीभूत असतात. त्यामुळे या वाहनचालकांना शिस्त लावण्याची अथवा कॅसिनोसमोर वाहने पार्किंग करण्यास बंदी घालण्याची गरज आहे.

कॅसिनो चालकांना सरकारचाच पाठिंबा असल्याने ते थोडेच कोंडी दूर करणार आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांमुळे कोंडी होत असल्याने वाहनांना रस्त्यावर उभे राहू न देणे म्हणजे कंपन्यांचे नुकसान करून घेणे असा त्याचा अर्थ होतो हे त्यांनाही माहीत आहे. शिवाय सगळ्यात कॅसिनो चालकांमध्ये ग्राहक मिळवण्याची स्पर्धा आहे ती वेगळीच. यातून त्रास होत आहे तो मात्र सामान्य माणसांना. त्यांना वाहतूक कोंडीचा आणि अपघाताच्या भीतीचा सामना पावलापावलावर करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news