Keri Forest Wildlife | केरी जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रकारात मोठी वाढ; स्थानिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Keri Forest Wildlife | स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण; कठोर कारवाई करण्याची वन्यजीवप्रेमींची मागणी
Wildlife
WildlifePudhari
Published on: 
Updated on: 

हरमल : पुढारी वृत्तसेवा
केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रातील श्री आजोबा परिसरासह अन्य भागातील घनदाट जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महाराष्ट्रातील नवख्या तसेच अनुभवी शिकार्यांचा केरी गावातील वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Wildlife
Goa Harmal Navratri Festival | हरमल नवरात्रौत्सवात ११ ते १९ पर्यंत भरगच्च कार्यक्रम

गेल्या आठवड्यात एका कुत्र्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. कुत्र्याचा जबडा फुटल्याने शिकारीसाठी स्फोटक पदार्थ किंवा छोटा बॉम्ब वापरण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. या परिसरात मोर, लांडोर, रानडुकरे आणि ससे अशा वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

Wildlife
Goa Harmal Farmers Worried | पावसाचा लहरीपणा; शेतकरी हवालदिल शेती पूर्णतः परिपक्व न झाल्याने हरमल परिसरातील शेतकरी चिंतेत

स्फोटंकांच्या वापरामुळे स्थानिकांचा जीव धोक्यात

शिकारीसाठी स्फोटक पदार्थाचा वापर होत असल्याची शक्यता अधिक चिंताजनक आहे. जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिकारीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून वन्यप्राण्यांची हत्या आणि शिकारीत सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news