

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
बेकायदेशीररीत्या असलेल्या नाईट सुरू क्लबमधून संबंधितांना १० ते २५ लाख पर्यंत हप्ता दिला जातो. हडफडे येथील अग्नी दुर्घटना घडलेल्या बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लब कडून सुद्धा २५ लाखांचा हप्ता दर महिन्याला जात होता, असा गौप्य स्पोट कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केला.
कांदोळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की सदर नाईट क्लबला हडफडे पंचायतीने डिमोलीशनची नोटीस बजावली होती, तसेच या बांधकामाविषयी आमदार संकल्प अमोणकर यांनी विचारला होता, तरीसुद्धा या क्लब वर कारवाई का करण्यात आली नाही. क्लबच्या बेकायदेशीर आग्नेलो फर्नाडिस विधानसभेत प्रश्न सर्वसाधारण गोमंतकीयांना कोणतेही परवाने घ्यायचे असतील तर अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात; परंतु दिल्लीवाल्यांना हेच परवाने सहजपणे मिळतात, असे यावेळी ते म्हणाले.
अमलीपदार्थाची विक्रीही
किनारी भागातील हे नाईट क्लब शोसाठी महागडे डीजे आणतात कारण त्या क्लब मध्ये अमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते, अन्यथा मद्य विक्रीतून महागडे डीजे परवडू शकत नाही, असा गंभीर आरोप आग्नेलो फर्नांडिस यांनी केला.