IFFI 2026 Tribute Nana Patekar Vijaya Mehta| इफ्फी, नाना आणि विजयाबाई !

IFFI Nana Patekar | इफ्फी, नाना आणि विजयाबाई !
नाना पाटेकर आणि विजयाबाई
नाना पाटेकर आणि विजयाबाई Pudhari photo
Published on: 
Updated on: 

या वर्षाची सुरुवात काही दुःखद घटनांपासून झाली. अजितदादा, आशाताई, विजयाबाई आणि अगदीच अलिकडे नाना. या सर्वांनी जगाचा निरोप घेतला. इफ्फीमध्ये या सर्वांची आठवण येतच होती. आता तुम्ही म्हणाल अजितदादांचा इथे काय संबंध? तर २००४ साली इफ्फी अजितदादा कोकणात आणण्याचा प्रयत्न करत होते. सिंधुदुर्गामध्ये त्यांनी त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचा प्रस्तावही मंजूर केला; पण ऐनवेळी त्यांनी केंद्रात मनोहर पर्रीकरांना सपोर्ट केला, असे एकिवात आहे.

असो! नाना आणि इफ्फी हे काही नवीन समीकरण नव्हते. नानांचे स्वतःचे घर गोव्यात होते आणि नातेवाईकही जवळच राहतात. म्हणून त्यांची एक तरी चक्कर असायची. २०१५ मध्ये त्यांनी प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा इफ्फीतला अनुभवला. नाना कधीच एक हिरो वावर सर्वांनीच म्हणून वावरत सर्वसामान्य म्हणून नेहमीच्या आयुष्यात तो एक अस्सल नट नानांच्या मातेसमान मेहता म्हणायच्या. नाहीत. तर तो एक आहे, असे असलेल्या विजया विजयाबाईंच्या प्रत्येक नाटक सिनेमातील प्रत्येक पात्र हे असेच सहज अभिनय करायचे. एनसीपीएमध्ये एकदा विजयाबाई नानांच्या बाबतीत म्हणाल्या होत्या की, यांच्या पोटात हृदयात जे असते ते त्यांच्या तोंडातून बाहेर पडायचे. हे अगदी खरं आहे.

नाना म्हणायचा की, माझ्या एकूण तीन आया आहेत. पहिली माझी बायोलॉजिकल आई, दुसरी विजयाबाई, आणि तिसरी सुलभाताई. या तिघींनी मला योग्य वळणावर आणले, नटापेक्षाही माणूस म्हणून घडविले. नानांनी विजया मेहता आणि सुलभा देशपांडे यांना कितींदा इफ्फीमध्ये येण्याचा आग्रह धरला; पण या दोघीही इतक्या साध्या होत्या की, त्यांना चमकधमत सहन व्हायची नाही. म्हणून त्या दोघींनी नानांची ही इच्छा कधीच पूर्ण केली नाही. नाना आणि या दोघी जिथे एकत्र असायच्या तेव्हा तिथले वातावरण भारलेले असायचे की, हे तिघे तेथेच एखादा नाट्यप्रवेश दाखवतात की काय, असे वाटायचे. आता हे तिघेही हयात नाहीत.

आपण आशाताई आणि लता मंगेशकरांना जरी दीदी म्हणायचो, त्यांना अहो जाओ करायचो. पण सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर आणि विजय मेहता, सुलभा देशपांडे आणि सुमित्रा भावे यांचा उल्लेख करताना ओघवतेपणाने कधीच तोंडात अहो-जाओ येत नाही तर अरे तुरे, अगं तुगं असंच येतं.

सचिन आणि नानाने स्वतःला खूप गाजवले; पण या तिघीजणी उपेक्षितच राहिल्या. गेल्यावर्षीचे महासंचालक शेखर कपूर आणि काही वर्षांपूर्वी ईराणी सुप्रसिद्ध दिग्दर्शक माजिदी यांनी या तिघींचे व्यासपीठावर भरभरून कौतुक केले. पण, या तिघींची इफ्फीने उपेक्षाच केली. काही वर्षांपूर्वी या तिघींची इफ्फीतील मास्टर क्लाससाठी चर्चा झाली; पण नंतर सगळे फिस्कटले. आता वेळ निघून गेली आहे, आता तर या तिर्धीवर इफ्फीमध्ये रेट्रोस्पेक्टिव व्हावा, अशी इच्छा. या सर्वांबद्दल खूप काही लिहिता येईल.

- उज्ज्वल चंदावार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.