Hospicio South Goa District Hospital : 'हॉस्पिसिओ'तील स्वच्छतागृहांची दुरवस्था

प्रश्न पुन्हा ऐरणीवर : रुग्णांची गैरसोय, दुरुस्तीची मागणी
Hospicio South Goa District Hospital
मडगाव हॉस्पिसिओ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्थाpudhari photo
Published on: 
Updated on: 

मडगाव : दक्षिण गोव्याच्या प्रमुख सरकारी आरोग्य सेवा केंद्रांपैकी एक असलेल्या हॉस्पिसिओ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृहे, मुताऱ्या आणि वॉशरूमची दुरवस्था झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील सुमारे ३० ते ४० टक्के स्वच्छतागृहे दुरुस्ती व देखभालीअभावी वापरण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे.

दक्षिण गोव्यातील विविध तालुक्यांतून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण हॉस्पिसिओत उपचारासाठी येतात. त्यामुळे स्वच्छतागृहांवर मोठा ताण असतो. मात्र अनेक ठिकाणी दरवाजे तुटलेले, फ्लश यंत्रणा बंद, पाण्याचा अपुरा पुरवठा, गळती आणि तुंबलेले ड्रेनेज अशा समस्या आहेत. काही स्वच्छतागृहे बंद ठेवण्यात आल्याने कार्यरत असलेल्या मोजक्या स्वच्छतागृहांवर अतिरिक्त ताण पडत असून, स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Hospicio South Goa District Hospital
Goa plastic waste cattle deaths : प्लास्टिकच्या विळख्यात गोवंश; चार वर्षांत 2,380 गुरांचा मृत्यू

कॅज्युअल्टी विभाग, पुरुष व महिला मेडिसिन वॉर्ड, बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची वर्दळ असलेल्या भागांत ही समस्या अधिक तीव्र असल्याचे सांगण्यात येते. आपत्कालीन उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत त्यांच्या कुटुंबीयांना अनेक तास रुग्णालयात थांबावे लागते. अशा वेळी स्वच्छतागृहे बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोविड काळात नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक इमारतीत मोठ्या संख्येने स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. मात्र नियमित देखभालीअभावी काही वर्षांतच त्यांची अवस्था खराब झाल्याची तक्रार रुग्ण व नागरिकांनी केली आहे.

Hospicio South Goa District Hospital
Goa Assembly Election 2027 : फोंडा मतदारसंघात आमदारकीसाठी रस्सीखेच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news