Goa heatwave alert | सावधान! उन्हामुळे राज्य होरपळतेय...प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी;

उपाययोजनांसह योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन
Heatwave Alert
Heatwave AlertPudhari
Published on
Updated on

पणजी: भारतीय हवामान खात्याने वाढत्या उष्णतेमुळे १२ मेपर्यंत हायअलर्ट जारी केला आहे. या काळात तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. महाराष्ट्रात काही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने या काळात कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

Heatwave Alert
Goa- एकात्मिक पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विरोध

एसी वापरताना...

एसी फक्त रहिवासी असलेल्या खोल्यांमध्येच वापरावा, शक्यतो २४-२५ अंश सेल्सिअस तापमानावर ठेवावे. दर २-३ तासांनी ३० मिनिटांची विश्रांती घ्यावी. जेव्हा बाहेरचे तापमान ४५-४७अंश सेल्सिअस असेल, तेव्हा घरातील एसी २४-२५ अंश सेल्सिअसवर ठेवा.

अशी घ्या काळजी...

१) थेट सूर्यप्रकाश टाळा २) सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान कोणीही (मोकळ्या आकाशाखाली) बाहेर जाऊ नये. ३) चक्कर येत आहे का? तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ४) हवा खेळती राहण्यासाठी दारे आणि खिडक्या उघड्या ठेवा. ५) मोबाईलचा वापर मर्यादित करा, स्फोटाचा धोका आहे. ६) दही, ताक, थंड रस यांना प्राधान्य द्या. ७) उन्हाळ्यात विंचवांपासून सावध रहा, ८) भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्या २) गॅस सिलिंडर थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. १०) विद्युत मीटरवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका.

Heatwave Alert
Goa |विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी माजी शिक्षकाला ११ वर्षांची सक्तमजुरी

गाडीमधून या वस्तू काढा

1. गॅस उपकरणे, २. लायटर, ३. कार्बनयुक्त पेये, ४. अत्तर आणि उपकरणे ५. हवा खेळती राहण्यासाठी गाडीच्या खिडक्या किंचित उघड्या ठेवा. ६. इंधन टाकी पूर्णपणे भरू नका. ७. संध्याकाळी इंधन भरा, ८. सकाळी गाडीने प्रवास करणे टाळा. ९. संध्याकाळी, विशेषतः प्रवासाला निघण्यापूर्वी, इंधन कमी करा, जागरूक राहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news