Mahashivratri 2026 Goa | गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा; कलशारोहण उत्साहात

Mahashivratri 2026 Goa | जगद्गुरू नरेंद्राचार्य, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह साधुसंतांची उपस्थिती
Mahashivratri 2026 Goa
Mahashivratri 2026 Goa
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ओल्ड गोव्यातील वायंगणी येथील भव्य गोवेश्वर महाशिव मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा विधिवत व मोठ्या थाटामाटात झाला.

Mahashivratri 2026 Goa
International Ayush Conference Dubai 2026 | दुबईतील आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत गोव्याची वेलनेस पर्यटनदृष्टी झळकली

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम झाले. धार्मिक विधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मंदिराबाहेर येऊन पूजाविधी संपन्न झाल्याचे व मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले झाल्याचे जाहीर केले.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या सोहळ्यात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, प. पू. कानिफनाथ महाराज तसेच देशभरातून आलेले वेगवेगळ्या आखाड्याचे साधुसंत यांची उपस्थिती होती. सर्व धार्मिक विधी नाशिकचे वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी गोव्याचे पद्मनाभ पीठाचे मठाधिपती पद्मश्री प. पू. ब्रम्हेशानंदाचार्य महाराज, वीज मंत्री दिगंबर कामत, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार राजेश फळदेसाई, आमदार अॅड. कार्लोस फेरेरा, भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक आदींची उपस्थिती यावेळी होती.

मुख्यमंत्री सावंत यांचे सकाळी कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांनी मंदिर व सर्व परिसर पहिला. मंदिराच्या उभारणीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. गोवेश्वर महाशिव मंदिरातील सहा फूट उंचीच्या पिंडीचे पूजन केले. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण झाले. कलशारोहणावेळी मंदिरावर ध्वजारोहणही करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "गोव्याच्या संस्कृतीला मोठी परंपरा आहे. मध्यंतरीच्या काळात ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो सफल झाला नाही. जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी उभारलेल्या या मंदिरामुळे गोव्याच्या संस्कृतीत भर पडली आहे.

Mahashivratri 2026 Goa
Election Goa | सासू-सून आगरवाडा-चोपडेच्या कारभारीण

ती आणखी पाचशे वर्षे जिवंत राहील एवढे ऐतिहासिक काम स्वामीजींनी केले आहे. त्यांनी नेहमीच रंजल्या गांजल्यासाठी काम केले आहे." गोव्यातील हे मंदिर पाषाणातील कोरीव कलाकृती आहे. यासाठी चुनार दगडाचा वापर करण्यात आला आहे. बांधकामात कुठेही लोखंड वापरलेले नाही. येथे बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा आनंद येथे मिळणार आहे.

'गोवेश्वर महिमा संहिता' ग्रंथाचे लोकार्पण

गोवेश्वर महाशिव मंदिरात जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी लिहिलेल्या 'गोवेश्वर महिमा संहिता' या ग्रंथाचे लोकार्पण राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते आज झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत, राज्यपालांच्या सौभाग्यवती, जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, प. पू. कानिफनाथ महाराज, संतमहंत आदी उपस्थित होते. या ग्रंथाचे लेखन जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले आहे. हा ग्रंथ म्हणजे गोव्याच्या वैदिक सनातन परंपरेचा इतिहास मांडणारा आहे. चौदाशे पानांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ गोव्याच्या धार्मिक इतिहासाचा महत्त्वाचा पुरावा ठरणारा आहे. तो गोव्याच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा एक नवा अध्याय ठरेल, असा विश्वास जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news