Goa Government Housing for All scheme|सरकारची हाऊसिंग फॉर ऑल योजना, घर नसलेल्यांना 5 हजारात फ्लॅट

Government Housing for All scheme flats at Rs 5000- सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी 35 लाखापर्यंत कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्याची घोषणा
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : राज्यातील ज्या नागरिकाकडे स्वतःचे घर नाही व ज्यांचे कुटुंब पोर्तुगीज काळापासून गोव्यात राहतात, अशा नागरिकांना फक्त पाच हजार रुपये भरून 30 वर्षासाठी सरकार फ्लॅट उपलब्ध करणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी चार टक्के व्याजावर 35 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. या दोन्ही घोषणा आज गुरुवारी पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेतकेल्या.यावेळी आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अनेक नागरिकांना स्वतःची घरे नाहीत, असे जे नागरिक आहेत, त्याचे पूर्वज पोर्तुगीज काळापासून गोव्यात राहतात. अशा मूळ गोवेकरांना 30 वर्षाचा निवासी दाखला दिल्यानंतर व ज्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, अशा लोकांना सरकार फ्लॅट देणार आहे. गोवा गृहनिर्माण मंडळ आणि पुनर्वसन मंडळ यांच्या संयुक्तपणे विविध ठिकाणी फ्लॅट उपलब्ध केले जातील, हे प्लॅट 30 वर्षासाठी लीजवर दिले जाणार आहेत कारण कुणी ते विकू नयेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दुसऱ्या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणी किंवा फ्लॅट खरेदीसाठी 4 टक्के व्याजावर 35 लाख रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाईल. सरकारी कर्मचाऱ्यासह सरकारी महामंडळाचे कर्मचारी व पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या ज्यांची घरे बांधणी चालू आहे, त्यांनाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून किमान पाच वर्षांची सेवा या योजनेसाठी हवी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मच्छीमार विज्ञान महाविद्यालयासाठी 20 पदांची निम्रिती, आदिवासी कल्याण खात्यासाठी 6 पदाची मान्यता व एससी एसटी आर्थीक विकास महामंडळासाठी 9 पदांना मान्यता हे निर्णयही आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले.

एसटी राखीवते साठी सरकार गंभीरच

राज्यातील आदिवासी (एसटी) ना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी सरकार गंभीर आहे. 100 टक्के सरकारने प्रयत्न केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाची स्थगीती न उठवता उच्च न्यायालयालाच सुणावणी करण्यास सांगितले आहे. गोवा सरकार व केंद्र सरकार आणि आदिवासीच्या एका संघटनेने याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

CM Pramod Sawant
Goa Parking Scam | गोव्यात पर्यटकांकडून पार्किंगसाठी पाचपट वसुली; पर्यटन विभागाने कंत्राटच रद्द केले

आता उच्च न्यायालयाला केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गोवा सरकार शुक्रवारी करेल व मशन एसटी पॉलिटिकल रिझर्व्हेशनही करील. उच्च न्यायालयाला 24 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचे सांगितले गेले आहे. आपणाला विश्वास आहे की, येत्या निवडणुकीत आदिवासीसाठी निश्चितपणे राजकीय आरक्षण मिळेल. असे सांगून राजकीय आरक्षण मिळाले नसले तरीही भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत पाचपेक्षा जास्त जागी एसटी उमेदवार दिले होते. असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Pramod Sawant
Goa ST Reservation | गोव्यातील एसटी आरक्षणाला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.