Goa Parking Scam | गोव्यात पर्यटकांकडून पार्किंगसाठी पाचपट वसुली; पर्यटन विभागाने कंत्राटच रद्द केले

Goa Parking Scam | कळंगुट येथील पे-पार्किंगमध्ये पर्यटकांकडून निर्धारित शुल्कापेक्षा पाचपट रक्कम वसूल केल्याप्रकरणी गोवा पर्यटन विभागाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई केली आहे.
Parking space
Parking space Pudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कळंगुट येथील पे-पार्किंगमध्ये पर्यटकांकडून निर्धारित शुल्कापेक्षा पाचपट रक्कम वसूल केल्याप्रकरणी गोवा पर्यटन विभागाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई केली आहे. कर्नाटक कमर्शियल अँड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (केसीआयसी) या कंपनीला देण्यात आलेले पार्किंगचे कंत्राट पर्यटन खात्याने तत्काळ प्रभावाने रद्द केले आहे.

Parking space
Iffi Goa| सप्तरंगी इफ्फीचे पणजी कायमचे माहेरघर

१५ नोव्हेंबर रोजी नागपूरहून गोव्यात आलेल्या पर्यटकाकडून कळंगुटमधील पार्किंगमध्ये ३५ आसनी बस चार तास उभी करण्यासाठी तब्बल १,००० रुपये आकारण्यात आले होते. प्रत्यक्षात या श्रेणीतील वाहनासाठी सरकारने निश्चित केलेले अधिकृत पार्किंग शुल्क २०० रुपये आहे. त्यामुळे पर्यटकाकडून निर्धारित शुल्काच्या तुलनेत पाचपट रक्कम वसूल करण्यात आली.

या प्रकाराची माहिती माध्यमांतून समोर आल्यानंतर पर्यटन खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, नोटिशीला दिलेल्या उत्तरात केसीआयसीने शुल्कवसुलीत कोणतीही चूक झाली नसल्याचे सांगत अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Parking space
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

कंत्राटदाराचे हे स्पष्टीकरण पर्यटन खात्याला मान्य झाले नाही. पर्यटन संचालक केदार नाईक यांनी कंत्राटदाराचे उत्तर असमाधानकारक असल्याचे नमूद करत करारातील अटींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर पर्यटन खात्याने २४ नोव्हेंबर रोजी कंत्राट रद्द करण्याचा अधिकृत आदेश जारी केला. आदेशानुसार, केसीआयसीला पार्किंग शुल्काची वसुली तत्काळ थांबवण्याचे तसेच संबंधित पार्किंगची जागा पर्यटन खात्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.