

Gomant Bhushan Award announced for famous singer Ajitkumar Kadkade
पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात जन्मलेले व सध्या मुंबईत स्थायिक झालेले प्रसिद्ध गायक पं. अजितकुमार कडकडे यांना गोव्याचा सर्वोच्च प्रतिष्ठेचा गोमंतभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (शुक्रवार) गोवा घटक राज्य दिन सोहळ्यात ही घोषणा केली. दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो.
दरम्यान हा पुरस्कार सर्वप्रथम माझ्या आई-वडीलांचा त्यानंतर माझे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आहे. पं अभिषेकी यांच्यामुळे माझी गायकी सुरू झाली आणि अजून सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या संतांच्या आशीर्वादाने मी गातो आणि जे रसिक हे गायन मनःपूर्वक ऐकतात त्यांचाही हा पुरस्कार आहे.
सर्वात शेवटी हा पुरस्कार माझा. हा पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अशी प्रतिक्रिया पं. अजितकुमार कडकडे यांनी 'गोमंत विभूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.