Golden Goa-राज्याला 'गोल्डन गोवा' करणार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान : कुशावती जिल्ह्यात विज्ञान केंद्र उभारणार
फोंड्यातील कार्यक्रमात लाभार्थीसमवेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर.
फोंड्यातील कार्यक्रमात लाभार्थीसमवेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर.
Published on: 
Updated on: 

फोंडा : गोवा राज्य हे सर्वच दृष्टीने विलोभनीय आणि सुंदर असून, समृद्ध अशा या राज्यात अधिकाधिक साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरभक्कम निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगताना या राज्याला 'गोल्डन गोवा' करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी फोंड्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. राज्यात नव्यानेच निर्मिलेल्या कुशावती जिल्ह्यात विज्ञान केंद्र उभारले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मोहिमेंतर्गत सेवा संकल्प अभियान कार्यक्रम सनग्रेस गार्डन सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री शिवराज सिंह चौहान बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, कला संस्कृती मंत्री रमेश तवडकर, खासदार सदानंद तानावडे, सभापती डॉ. गणेश गावकर, आमदार उल्हास तुयेकर, प्रेमेंद्र शेट, देविया राणे, मुख्य सचिव कांदावेलू आदी उपस्थित होते.

शिवराज सिंह चौहान म्हणाले, गोव्याकडून जगाने शिकून घ्यावे, असे हे आदर्श राज्य आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समर्थ नेतृत्वाखाली गोव्याचा विकास होत असून, येथील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे हे राज्य समृद्ध आहे. ते अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून सुरु आहे, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे गोवा समृद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे गोवा समृद्ध होण्यात अधिक हातभार लागला आहे. गोवा कृषीप्रधान राज्य असून, कृषी उत्पादनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होताना येथील कृषी उत्पादनांची निर्यात करण्यावर भर दिला जाणार आहे. तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती केली असून, राज्य अधिक समृद्ध करण्यासाठी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्याच्या समृद्ध विकासात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून केंद्राकडून आवश्यक सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.

स्वागत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. सकाळी फोंडा कदंब बसस्थानक आवारात शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सनग्रेस सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानात सहभागी नागरिक व संस्थांचा शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विविध उपक्रमांना सुमारे ८० कोटी रुपयांचे धनादेश या कार्यक्रमात देण्यात आले.

फोंड्यातील कार्यक्रमात लाभार्थीसमवेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर.
Sachin Pilot vote ban allegation | नोट बंदीनंतर आता वोट बंदी

काँग्रेसवर टीका

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर टीका करताना भाजपने केलेली प्रगती काँग्रेसला खूपत असून, एसआयआर सारख्या मुद्द्यावरून काँग्रेस निरर्थक आवाज करीत असल्याचे सांगितले. ज्यांनी देशावर आणीबाणी लादली, प्रत्येक वेळी मुख्यमंत्री बदलले आणि जे स्वतःचेच रक्षण करू शकत नाहीत ते गोवा रक्षण यात्रा काढत आहेत, असे सांगताना प्रत्येकवेळी निवडणूक हरलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष करते. यावरून या पक्षाची पात्रता काय ते कळते, अशी टीकाही चौहान यांनी केली.

फोंड्यातील कार्यक्रमात लाभार्थीसमवेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर.
Bardez food establishments sealed Goa FDA -बार्देशमधील सहा खाद्य आस्थापने सील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news