Bardez food establishments sealed Goa FDA -बार्देशमधील सहा खाद्य आस्थापने सील

एफडीएच्या धडक मोहिमेत कारवाई : नियमांचे पालन होईपर्यंत कारवाई कायम
FDA food safety inspection
FDA food safety inspectionpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएल) बार्देश तालुक्यात राबविलेल्या विशेष निगराणी मोहिमेदरम्यान केलेल्या तपासणीवेळी ११ पैकी ६ खाद्य आस्थापनांना कामकाज थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींवर संबंधित आस्थापनांनी सादर केलेले अनुपालन समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई केली.

एफडीएच्या पथकाने बार्देश

तालुक्यात रेस्टॉरंट, चिकन कत्तलखाने यांसह एकूण ११ खाद्य व्यवसायांची तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे पालन, स्वच्छता आणि आवश्यक अनुपालन यांचा आढावा घेण्यात आला. एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत आढळलेल्या त्रुटी दूर केल्या जात नाहीत आणि नियमांचे समाधानकारक पालन होत नाही, तोपर्यंत संबंधित आस्थापनांचे कामकाज बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

एफडीच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर आणि डार्लेन दिवकर, तसेच कर्मचारी संदीप शेळके यांच्या पथकाने विविध खाद्य व्यवसायांची तपासणी केली. दरम्यान, एफडीएची ही निगराणी मोहीम गोव्यातील इतर भागांतही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खाद्य व्यवसाय चालकांनी विहित अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.

विशेषतः दुधाच्या पर्यायांपासून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या लेबलिंगबाबत सरकारने नुकत्याच जारी केलेल्या, मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर एफडीएने दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रेत्यांवरील तपासणी अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

FDA food safety inspection
North Goa special voter registration drive-वंचित, नव्या पात्र मतदारांसाठी उत्तर गोव्यात विशेष नोंदणी मोहीम

रिचर्ड नोरोन्हा यांनी सांगितले की, अशा उत्पादनांच्या लेबलची सखोल तपासणी केली जाणार असून, ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे किंवा चुकीची माहिती आढळल्यास कारवाई केली जाईल.

FDA food safety inspection
Goa News | ...तर २३ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news