

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील ५० पैकी तब्बल ४२ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये महिलांची मतदारांची संख्या जास्त आहे. एकूण मतदारांचा विचार करता २४ हजार जास्त मते महिलांची आहेत. जाहीर झालेल्या जिल्हा पंचायत निकालात ही महिलांची जादा मते VOTE आहे.
महिला मतदार या विशेषतः भाजपने जाहीर केलेल्या विविध परिणामकारक ठरली असून महिला किंगमेकर ठरल्याची चर्चा योजनांचा लाभ घेतात. त्यामुळे बहुतांश महिला मतदार भाजपसोबत राहिल्याचे अनेक महिलांनी सांगितले. त्यामुळेच भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाल्याचे कळते.
सत्तरी तालुक्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सभांना महिलांची होणारी गर्दी पाहता सत्तरीतील चारही मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराना मिळालेली ५ ते ११ हजारांची आघाडी ही महिला मतांचा परिणाम असल्याचे दिसून येते.