गोवा : साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा

गोवा : साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा
Published on
Updated on

पणजी: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात पंढरपूर तीर्थक्षेत्री श्री विठ्ठल रुखमाईच्या चरणी लाखो विठ्ठल भक्तांचा तथा वारकऱ्यांचा मेळा जमलेला असतानाच गोव्यातील १० ते १२ वारकऱ्यांची पथके पंढरपूरला पायी चालत गेली आहेत. आषाढी एकादशी निमित्त गोव्यातही मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.

गोव्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या साखळी येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये साखळी मतदारसंघाचे आमदार असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठल मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्या पत्नी प्राध्यापिका सुलक्षणा सावंत, मुलगी आदीसह मंदिराचे पुजारी उपस्थित होते.

गोव्यात मोठ्या प्रमाणात भक्तीभावाने आषाढी एकादशी साजरी केली जाते. गावागावांत असलेल्या विठ्ठल मंदिरासोबतच इतर देवतांच्या मंदिरात सुद्धा आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी आयोजित केले जातात. साखळी येथील विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल मूर्ती सोबतच रुक्मिणी आणि राही यांच्या मूर्ती आहेत. त्या पुरातन असून, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज पहाटे मूर्तींचे विधिवत पूजन केले. इतर ठिकाणीही भाविकांनी अशाच प्रकारे पूजन केले. दुपारनंतर मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम हाेणार  आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news